दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासारखी बातमी; लोकल प्रवास झाला आणखी सोपा


हायलाइट्स:

  • लोकल ट्रेन प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी
  • १८ वर्षांखालील सर्वांना लोकल प्रवास करता येणार
  • मासिक पासबरोबरच तिकीटही मिळणार

मुंबई: दसऱ्याच्या मुहूर्तावर रेल्वे प्रशासनानं मुंबईकरांना सोनेरी बातमी दिली आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासासाठी आता मासिक पास बरोबरच तिकीटही मिळणार आहेत. तसंच, १८ वर्षांखालील सर्वांना कोणत्याही अटीविना प्रवास करता येणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळं लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Local Train Travelling)

देशात करोनाचं संकट आल्यापासून बंद झालेल्या लोकल ट्रेनचे दरवाजे अद्यापही पूर्णपणे उघडलेले नाहीत. पहिल्या लाटेनंतर लोकल प्रवासाला काही अटींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र, दुसऱ्या लाटेनंतर परिस्थिती अधिकच बिघडल्यानं लोकलची दारं पुन्हा बंद झाली. दुसरी लाट ओसरल्यानंतर १५ ऑगस्टपासून कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस झालेल्या नागरिकांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. मात्र, अशा प्रवाशांना केवळ मासिक पास दिला जात होता. नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा फायदा झाला. मात्र, दोन डोसची अट पूर्ण करणाऱ्या व क्वचित प्रवास कराव्या लागणाऱ्या नागरिकांची यामुळं कोंडी झाली होती. एखाद्या वेळच्या प्रवासासाठी पूर्ण मासिक पास काढणं त्यांना शक्य नव्हतं. त्यांची ही कोंडी आता दूर झाली आहे. राज्य सरकारच्या सल्ल्यानुसार, कोविडचे दोन डोस पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना तिकीट देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. मात्र, तिकीट खिडकीवर ही सुविधा उपलब्ध असेल. अन्य कुठल्याही प्रकारे तिकीट मिळणार नाही.

वाचा: रामदास कदम शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जाणार नाहीत, कारण…

त्याचबरोबर, १८ वर्षांखालील सर्वांना आता रेल्वेनं प्रवास करता येणार नाही. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आठवीपासून पुढच्या वर्गातील शाळा व महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. येत्या २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू होणार आहेत. मात्र, १८ वर्षांखालील मुलांना लस देण्याची प्रक्रियाच सुरू न झाल्यानं त्यांना लसीच्या अटीची पूर्तता करता येणं अशक्य आहे. त्यांचीही अडचण नव्या निर्णयामुळं दूर होणार आहे. याशिवाय, आजारपणामुळं लस घेऊ न शकलेल्या नागरिकांनाही रेल्वे प्रवास करता येणार नाही. मात्र, त्याबाबतचं संबंधित डॉक्टरचं प्रमाणपत्र सोबत ठेवावं लागणार आहे.
वाचा: ‘पवारांनी लायसन्स नसलेल्या ड्रायव्हरला थेट व्होल्वो बस चालवायला दिली’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: