ज्ञानेश्वर दुधाणे यांना डॉ.कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार प्रदान

ज्ञानेश्वर दुधाणे यांना डॉ.कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार प्रदान

करकंब /मनोज पवार :- आज डॉ.ए.पीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ड्रीम फाउंडेशन व चाणक्य गुरुकुल सोलापूर यांचेवतीने प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवर व्यक्तिंना डॉ. कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ.ए.पीजे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली. यामुळे सर्वांना एक प्रकारची नवी प्रेरणा मिळाली, विविध क्षेत्रातील अनुभव ऐकायला मिळाल्याने आणखी जोमानं काम करण्याची उर्जा मिळाली.

 उपस्थित मान्यवरांच्या मनोगतानंतर करकंब सारख्या ग्रामीण भागामध्ये सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या  ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या कामाची दखल घेऊन ड्रीम फाउंडेशन या संस्थेने ज्ञानेश्वर दुधाणे यांना माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार, शिवचरित्रकार शिवरत्न शेटे,शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे,नुतन सी.ए.श्री.मंता,काशिनाथ भतगुणकी यांचे उपस्थितीत यांना डॉ.कलाम राष्ट्रप्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मनोगतात त्यांनी आपण कसे घडलो, सतत आपल्या कामात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते आणि सांस्कृतिक क्षेत्रात पं शौनक अभिषेकी यांचेमुळे खुप काम करण्याची संधी मिळाली असे सांगून शैक्षणिक क्षेत्रात मुलांना घडवण्याचे काम मनाला समाधान देऊन जाते. सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून श्रीराम प्रतिष्ठान, नादब्रह्म कला फाउंडेशन. पं.विकास कशाळकर फाउंडेशन यांचे माध्यमातून शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा सतत मिळत राहिली असे विचार प्रतिपादन केले. संगीता बिराजदार यांनी सर्वांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: