Video: कोण आला रे, कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला; ऋतुराजने CSKला लावला मराठी गाण्याचा नाद


पुणे: आयपीलच्या १४व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून चौथ्यांचा विजेतेपद मिळवले. चेन्नईच्या या विजया बरोबर संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने या स्पर्धेत सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप मिळवली. सर्वात लहान वयात ऑरेंज कॅप मिळवण्याचा विक्रम ऋतुराजने स्वत:च्या नावावर केला. त्याने १६ सामन्यात ६३५ धावा केल्या. यात एका शतकासह चार अर्धशतकाच समावेश होता.

वाचा-राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला फॅनने दिली धमकी, “हरला तर घरी येऊ देणार नाही”

चेन्नई सुपर किंग्जला गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला नव्हता. पण गेल्या हंगामातील अखेरच्या काही लढतीत ऋतुराजने स्पार्क दाखवला होता. तो स्पार्क त्याने या हंगामात देखील कायम ठेवला. ऋतुराजने या हंगामात ६४ चौकार आणि २३ षटकार मारले. चेन्नईच्या विजयात ऋतुराजची महत्त्वाची भूमिका होती. अनेक सामन्यात चेन्नईने मोठी धावसंख्या उभी केली कारण ऋतुराज शेवटपर्यंत मैदानावर उभा होता.

वाचा- मला कल्पना नाही; राहुल द्रविडच्या नियुक्तीवर विराटचे धक्कादायक उत्तर

मुंबई इंडियन्स प्रमाणेच चेन्नई सुपर किंग्जचा चाहता वर्ग मोठा होता. सीएसकेच्या सोशल मीडियावर नेहमी तामिळ भाषेचा आणि गाण्याचा वापर होतो. पुण्याच्या ऋतुराजने चक्क सीएसकेला मराठी गाण्याचा नाद लावला. आयपीएलचे विजेतेपद मिळवल्यानंतर ऋतुराज घरी परतला तेव्हा त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सीएसकेने सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यासाठी ‘कोण आला रे, कोण आला; महाराष्ट्राचा वाघ आला’ असे गाणं लावले आहे.

वाचा- धोनी आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याबाबत आली मोठी अपडेट; CSKचे अधिकारी म्हणाले…

वाचा- Ind Vs Pak Match: मी माझा मुलगा गमवलाय; भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच रद्द कराSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: