पंढरपूर येथे मोफत नेत्रतपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
पंढरपूर येथे मोफत नेत्रतपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न


पंढरपूर /प्रतिनिधी - सहकारतपस्वी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या ८६ व्या जयंती निमित्त आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय वाडकर मित्र परिवाराने प्रभाग क्रमांक ६ मध्ये दिनांक १२ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेवा सप्ताह चे आयोजन केलेले आहे.यात विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
चौथ्या टप्प्यात मोफत नेत्रतपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचा शुभारंभ युवक नेते प्रणव परिचारक आणि युवक नेते ऋषी परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी परिसरातील १८५ लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली आणि त्यातून ४० लोक मोफत मोतिबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत.यासाठी राष्ट्रीय अंधत्व निवारण समिती आणि डॉ खांडेकर याचे सहकार्य लाभले.
