महाराष्ट्रात जे जे प्रसिद्ध होईल ते माझ्या माढ्यात आणणार – अभिजीत पाटील
महाराष्ट्राचे हास्यवीरांचा माढा नगरीच्या मातीत रंगला मनोरंजनाचा थरार
सलग दुसऱ्या दिवशी माढ्यातील नागरिकांनी कृषी व सांस्कृतिक महोत्सव बघण्यासाठी केली तुडुंब गर्दी
माढा / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान आयोजित माढा कृषी व सांस्कृतिक महोत्सव – २०२४ महोत्सवाच्या सलग दुसऱ्या दिवशी माढा नगरीच्या मातीत महाराष्ट्राच्या हास्यवीर कलाकारांच्या हास्य,मनोरंजन आणि अदाकारीचा माढा मतदार संघातील नागरिकांना विशेष आनंद घेतला.
दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे हास्यवीर सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले व इतर कलाकारांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण झाले.आपल्या अस्सल मराठमोळ्या अंदाजात भार्गवी चिरमुले यांनी सादर केलेलं नृत्य.. रसिकांसाठी अद्वितीय ठरलं.. तर हास्य मनोरंजनाच्या कार्यक्रमात हास्यवीर अभिनेते पृथ्वीक प्रताप आणि अभिनेत्री शिवाली परब या कलाकारांनी प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसायला लावलं.
यासोबतच या प्रदर्शनात शेतकरी बांधवांना नवनवीन संशोधन,आधुनिक अवजारे, पिकांमधील नवनवीन जाती, शेतीच्या आधुनिक पद्धती याबाबत सखोल व शास्त्रोक्त मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमात नागरिकांना कृषी विषयक साहित्य पाहायला मिळत आहे.माढा मतदार संघात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथमच अशा पद्धतीचा कार्यक्रम होत असून माढा तालुक्यातील हजारो नागरिक याचा लाभ घेत आहेत याचा अभिमान आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.