खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन दिले.
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 ऑक्टोंबर 2024 – महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सोलापूर दौऱ्यावर आले असून सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, उद्योजक, व्यावसायिक, पत्रकार, सामाजिक संघटना, प्रतिष्ठित व्यक्ती, आजी-माजी खासदार, आमदार जिल्ह्यातील सर्व अधिकारी, राजकीय नेते, जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, यांच्याशी शासकीय विश्रामगृह येथे संवाद साधला.
यावेळी खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध मागण्यांचे निवेदन दिले.
केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना विविध आश्वासने दिली होती. वारेमाफ घोषणा केल्या होत्या. मात्र त्या आश्वासनाची पूर्तता सरकारने आजपर्यंत केले नाही. त्यातच वाढत्या महागाईमुळे आणि अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे, जुलमी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मेटाकुटीला आला आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील नागरिकांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत आहेत याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले.
▪️ सोलापूर उजनी पाईपलाईनसाठी कमी पडणारी 90 कोटी रक्कम उपलब्ध करून द्यावी.
▪️सोलापूर शहरासाठी अमृत दोन प्रकल्प 850 कोटीचा असून त्या प्रकल्पाला लवकरात लवकर मंजूर करावी.
▪️54 मीटर रस्ता विकसित करण्यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा.
▪️स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लवकरात लवकर घेण्यात याव्या.
▪️सोलापूरची विमानसेवा ताबडतोब सुरू करावी तसेच बोरामनी विमानतळ विकसित करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
▪️हद्दवाढ भागासाठी व MIDC साठी विशेष निधी देऊन तेथील रस्ते, ड्रेनेज, पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन, दिवाबत्ती, आदी मूलभूत सोयीसुविधा विकसित करावा.
▪️ उद्योगवाढी साठी प्रयत्न करून टेक्सटाइल पार्क, गारमेंट पार्क, IT उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा.
▪️यंत्रमाग उद्योग नुतनीकरणासाठी सवलत द्यावेत. यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात यावा.
▪️लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना तात्पुरते तडीपार करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत तसे करु नये. निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी योग्य रीतीने करून निवडणुका निष्पक्षतेने घेण्यात यावे.
▪️विधानसभा निवडणुकीत जतिधर्मात तेढ निर्माण करणारयांवर कडक कारवाई करण्यात यावी.
▪️शेती मालाला हमीभाव देण्यात यावा.
▪️सरसकट सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी.
▪️अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे केले परंतु नुकसानीची भरपाई मिळाली ती देण्यात यावी.
▪️शेतकऱ्यांच्या पाणी पट्टीत केलेल्या 10 पट वाढ कमी करण्यात यावी.
▪️शेतीसाठी 24 तास वीज पुरवठा दयावे,
▪️शेती अवजारे, खत व औषधे यावरील GST रदद् करावे,
▪️7.5 HP विज बिल माफ केले. 8 / 9 HP पुढील विज बील सुद्धा माफ करावे.
▪️PM किसानची रक्कम सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळावी,
▪️शेतीसाठी कॅनल मधून पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे.
▪️सोयाबीन, तूर, कांदा, उडीद व फळबाग यांचा पिक विमा विमा मिळावा.
▪️ज्या त्या भागात जे पिक घेतलं जातं त्याचा समावेश पिक विम्यात करण्यात यावा.
▪️प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी गायरान जागा गावठाण करावी किंवा गायरान जागेवर घरकुल बांधण्याची परवानगी दयावी.
▪️गावास स्वतंत्र महावितरण वायरमन उपलब्ध करून दयावा,
▪️गावाला व शेतकऱ्यांना मागणीनुसार MSEB DP देण्यात यावा,
▪️नदीला पाणी सोडल्यानंतर वीज पुरवठा पूणवेळ करण्यात यावा.
▪️जल-जीवन योजनेचा अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्यात यावेत.
▪️दुधाला 40 रु दर मिळावा व दूध अनुदान शेतक-याच्या थेट खात्यामध्ये करण्यात यावे.
▪️सर्व प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना धान्य मिळावे,
▪️गाव दत्तक घेतलेल्या बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करावा.
▪️शेतक-यांच्या वर्ग 2 जमीनी वर्ग 1 करण्यात यावेत.
▪️सर्व रस्ते plan मध्ये घ्यावेत. Plan – Non Plan असा भेदभाव करु नये.
▪️DCC बँकेने शेतकऱ्यांना पूर्वप्रमाणे कर्ज पुरवठा करावा,
▪️मंगळवेढा तालुका 24 गावाचा उपसा सिंचन योजना त्वरीत कार्यान्वित करावी.
▪️मराठा, धनगर, मुस्लिम, कोळी समाजास आरक्षण दयावे.
अशा मागण्यांचे निवेदन देऊन सोलापूर जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांचे, शेतकऱ्यांचे वरील विविध प्रलंबीत प्रश्नांचे निवारण होण्याकरीता आपल्या स्तरावर केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्याकडे पाठपूरावा करण्यात यावा अशी विनंती सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.