आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन – टोल फ्री क्रमांक 18002331240 कार्यान्वित
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज , दि.17:- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांना व मतदारांना निवडणूक व आचारसंहिता आदीबाबत माहिती मिळावी व तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी निवडणूक नियंत्रण व समन्वय कक्ष, प्रांत कार्यालय पंढरपूर येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. हे तक्रार निवारण केंद्र चोविस तास कार्यरत राहणार असून नागरिकांच्या निवडणुकीसंदर्भात असलेल्या तक्रारीचे या केंद्रामार्फत निवारण करण्यात येणार आहे.

टोल फ्री क्रमांक 18002331240 हे तक्रार निवारण केंद्राचा टोल फ्री क्रमांक आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसंदर्भात नागरिकांनी व मतदारांनी या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन 252 पंढपूर विधान सभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
मतदारांनी आपले नांव मतदार यादीत असल्याची खात्री करावी
निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.या निवडणुकीत प्रत्येक मतदारांनी आपला मताधिकार बजावून सहभाग नोंदवावा. मतदानाचा हक्क नोंदवण्यासाठी मतदार यादीत आपले नाव असणे अत्यावश्यक आहे. मतदारांनी आपले नांव मतदार यादीत असल्याची खात्री करावी.
आपले नाव मतदार यादीत आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ व या लिंकचा वापर करावा असे आवाहनही 252 पंढपूर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.