क्रिप्टो करन्सीच्या तेजीला ब्रेक ; जाणून घ्या आज कितीने स्वस्त झाले डिजिटल कॉइन्स


हायलाइट्स:

  • बिटकॉइन आणि बिनान्स कॉइनमध्ये वाढ झाली.
  • सोलाना आणि कार्डानो हे कॉइन २ टक्क्यांपर्यंत घसरले.

मुंबई : गेल्या आठवड्यात तेजीने झळाळून निघालेल्या प्रमुख क्रिप्टो करन्सीच्या किमतीत आज सोमवारी घसरण झाली आहे. १० पैकी ६ डिजिटल कॉइन आज स्वस्त झाले. बिटकॉइन आणि बिनान्स कॉइनमध्ये वाढ झाली तर सोलाना आणि कार्डानो हे कॉइन २ टक्क्यांपर्यंत घसरले.

जगातील सर्वात लोकप्रिय असलेल्या बिटकॉइनमधील गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.आज सोमवारी बिटकॉइनच्या किमतीत २.५ टक्क्याहुन अधिक वाढ झाली. तो ६२३७९ डॉलरपर्यंत वाढला. करोना संकटानंतर मागील वर्षभरात जागतिक पातळीवर क्रिप्टो करन्सीबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात बिटकॉइनने ६५००० डॉलरचा विक्रमी पल्ला गाठला होता. त्याच दिशेने आता बिटकॉइनची वाटचाल सुरु आहे.

इथेरियमच्या किमतीत ०.९१ टक्के घसरण झाली आहे. एका इथेरियम कॉइनचा भाव ३८७२ डॉलर झाला. आज कार्डानोच्या किमतीत आज २ टक्के घसरण झाली आहे. एक कार्डानो कॉइनचा भाव २.१६ डॉलर आहे. बिनान्स कॉइनमध्ये देखील आज २ टक्के घसरण झाली.

मागील २४ तासात जागतिक क्रिप्टो करन्सी बाजारपेठेची उलाढाल २.५ लाख कोटी डॉलर्स इतकी वाढली आहे. यात बिटकॉइनचा दबदबा कायम आहे. एकूण क्रिप्टोच्या बाजारात बिटकॉइनचा तब्बल ४६.५ टक्के आहे. एक्सआरपीच्या किमतीत २.९२ टक्के घसरण झाली असून त्याचा भाव १.१० डॉलर आहे. डोजेकॉइनचा भाव ०.२४ डॉलर असून त्यात ०.२४ टक्के घसरण झाली. लिटेकॉइनचा भाव १८६ डॉलर असून त्यात ०.५८ टक्के घसरण झाली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: