अकोल्यात शनिवारी सायंकाळपासून रात्री पर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.तर वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अकोल्यात शनिवारी संध्याकाळपासून रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाशिम जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला आहे. अकोल्यात तीन तासांत 48 मिमी पावसाची नोंद झाली असून पातूर तालुक्यातील राहेर व उमरा परिसरात सोयाबीन पिकाची काढणी सुरू झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
काही भागात सोयाबीनचे पीक कापणी करून शेतात लावले होते मुसळधार पावसामुळे सोयाबीन भिजून गेले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. बाळापूर तालुक्यातील काही भागातही पिकांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
तसेच ज्या भागातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
तसेच शुक्रवारपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत पावसाचा अंदाज असल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.