मिलिंद म्हैसकर व मनीषा म्हैसकर मधमाशांच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले!


म. टा. खास प्रतिनिधी । मुंबई

राज्याच्या पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर व त्यांचे पती मिलिंद म्हैसकर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना अंजनेरी (नाशिक) ट्रेकिंगदरम्यान रविवारी घडली. मिलिंद यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. (Honey Bee Attack on Milind Mhaiskar and Manisha Mhaiskar)

म्हैसकर या आपल्या सहकाऱ्यांसह रविवारी ट्रेकिंगला गेल्या होत्या. यावेळी मिलिंद म्हैसकर हे सर्वात पुढे चालत होते, तर म्हैसकर या त्यांच्या मागे काही अंतरावर होत्या. त्यावेळी मधमाशांनी मिलिंद यांच्यावर अचानक हल्ला केला. मिलिंद लगेच मागे सरकले आणि त्यांनी मनीषा यांना पळण्यास सांगितले. मनीषा यांनी आपल्याकडील स्टोल त्यांच्या दिशेने फेकला. मिलिंद यांनी तो स्टोल पांघरला, मात्र तरीही त्यांना माशांचा दंश झाला. यावेळी काही स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत मनीषा म्हैसकर यांना कोट व शाल दिली. त्यामुळं त्यांना काही प्रमाणात संरक्षण मिळालं. आग किंवा धुरामुळंच मधमाशा पळून जाऊ शकतात हे तिथल्या एका व्यक्तीला माहीत होतं. त्यांनी तातडीनं हालचाल करून जाळ पेटवला आणि धूर केला. त्यानंतर बहुतांशी मधमाशा पळून गेल्या. क्वचित एखादी राहिली होती. हा अनुभव त्यांनी फेसबुकवर लिहिला आहे.

हेही वाचा:

शिवाजी पार्कवर रोषणाईसाठी इटलीचे दिवे; मनसेचा शिवसेनेला ‘हा’ प्रश्न

धक्कादायक! पुण्यात राहत्या घरी तरुणाचा गळा चिरून खूनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: