समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप; नवाब मलिक यांनी मालदीव, दुबईमधले फोटो केले शेअर
वाचा: आर्यन खानला तातडीचा दिलासा नाही! २६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत राहावं लागणार
‘करोनाच्या काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या कुटुंबातील लोकही तिथं उपस्थित होते. समीर वानखेडे हे स्वत: दुबई किंवा मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवला गेली होती का याचं उत्तर त्यांनी द्यावं,’ अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
नवाब मलिक यांचं ट्वीट
सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर केंद्र सरकारनं समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली केली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. चार-चार हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉट्रसअॅप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभं करण्यात आलं व दहशत निर्माण करण्याचं काम केलं गेलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. मालदीव व दुबईमध्ये बॉलिवूडवाल्यांकडून ही वसुली करण्यात आली,’ असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
वाचा: धक्कादायक! शिर्डी संस्थानच्या अधिकाऱ्याकडून साईभक्त महिलांना अश्लील संदेश