पंढरपूरातील लिंकरोडवरील धोकादायक जड व अवजड वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करा – यशवंत डोंबाळी
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंंढरपूर शहरातील उपनगरातून जाणाऱ्या गजबजलेल्या लिंकरोडवरील धोकादायक जड व अवजड वाहनांना तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतूकीस तात्काळ बंदी करण्यात यावी अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशन पंढरपूरचे अध्यक्ष यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे .
लिंकरोडवरून उपनगरातील नागरिकांची , जेष्ठ नागरिक व शाळा काॕलेजेसला जाणाऱ्या मुलामुलींची सतत वर्दळ असते तसेच परिसरातील सर्व उपनगरांचे रस्ते लिंकरोडलाच जोडलेले आहेत.या रस्त्यावर अनेक हॉटेल्स आहेत. लिंकरोडवर काही ठिकाणी गतीरोधक लावलेले असले तरी जड व अवजड वाहने बेफाम बेजबाबदारपणे चालवली जात असतात.एकमेकांना ओव्हरटेक करताना फूटपाथ शेजारून वाहने नेतात त्यामुळे पादचारी नागरिकांना तसेच दूचाकी स्वारांना धोकादायक परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे तसेच स्पिड ब्रेकर्सही शास्त्रशुद्ध पद्धतीने बनविलेले नसल्याने उलट दुचाकीवर मागे बसलेला व्यक्ती उडून पडून अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
लिंकरोडवरील जड व अवजड वाहनांची तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची धोकादायक वाहतूक वाखरी मार्गे शहराच्या बाहेरून काढण्यात यावी व तसे फलक ठिकठिकाणी लावण्यात यावेत अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशन पंंढरपूरचे अध्यक्ष यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी पोलीस अधिक्षक , सोलापूर जिल्हा ग्रामीण यांचेकडे केली आहे. लिंकरोडवरील जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद झाल्यास काॕलेज चौकातील वाहतूक कोंडीही बंद होईल आणि विद्यार्थी, नागरिकांना व वाहनधारकांना सुरक्षित वातावरणात ये जा करतात येईल.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.