punjab congress : पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेसने आता प्रभारी हरीश रावत यांना हटवले


नवी दिल्लीः काँग्रेसने राजस्थानचे कॅबिनेट मंत्री हरीश चौधरी यांची पंजाब आणि चंदिगडचे नवीन प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या जागी पंजाबचा कार्यभार स्वीकारतील. हरीश रावत यांना काँग्रेस सरचिटणीस आणि पंजाबच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. रावत काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य म्हणून कायम राहतील. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली. पंजाब काँग्रेसच्या प्रभारीपदी हरीश चौधरी यांची पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी नियुक्ती केली, असं पत्रकात म्हटलं आहे.

सरचिटणीस म्हणून हरीश रावत यांचे योगदान कौतुकास्पद आहे, असं वेगणुगोपाल यांनी पत्रकात म्हटलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पंजाब प्रदेश काँग्रेसमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर रावत यांनी अलिकडेच कॉंग्रेस हायकमांडला राज्याच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. उत्तराखंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी रावत यांनी ही विनंती हायकमांडला केली होती. उत्तराखंड हे रावत यांचे मूळ राज्य आहे. पुढील वर्षी उत्तराखंड आणि पंजाबसह पाच राज्यांची विधानसभा निवडणूक होणार आहे.

Fuel Prices: ‘मोदींच्या खरबपती मित्रांच्या’ माध्यमातून प्रियांका गांधींचा सरकारवर निशाणा

कोण आहेत हरीश चौधरी?

हरीश चौधरी राजस्थान सरकारमध्ये महसूल मंत्री आहेत. ते बाडमेर जिल्ह्यातील बैतू विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २००९ मध्ये हरीश चौधरी बारमेर-जैसलमेर लोकसभा मतदारसंघातून निवडून येत खासदारही झाले होते. हरीश चौधरी यांनी यापूर्वीही पक्षात मोठी जबाबदारी सांभाळली आहे.

nana patole : ‘शिवसेनेसोबत सत्तेत, पटोले, सिद्धू कुठून आले? भाजपमधून, ही काँग्रेसची धर्मनिरपेक्षता?’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: