‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे’


हायलाइट्स:

  • हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आणखी एका भाजप नेत्याचे वक्तव्य चर्चेत
  • खासदार संजय पाटील यांच्या वक्तव्याने भाजप अडचणीत
  • संजय पाटील यांच्या वक्तव्यामुळं चर्चेला उधाण

म. टा. प्रतिनिधी, सांगलीः ‘माझ्यामागे ईडी लागणार नाही, कारण मी भाजपचा खासदार आहे. आणि त्याहीपेक्षा आमची कर्जे पाहिली की ईडी म्हणेल, ही माणसं आहेत की काय?,’ अशी मिश्किल टिपणी भाजपचे खासदार संजय पाटील यांनी आज केली. सांगली जिल्ह्यातील विटा येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांनी कारवाईचा फास आवळला आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते ईडी, सीबीआयच्या रडारवर आहेत. त्यावरुन सातत्याने भाजप नेते आघाडी सरकारवर टीका करत असतात. तर, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप वेळोवेळी आघाडीच्या नेत्यांकडून होत असतो. त्यातच भाजप नेत्यांकडून होत असलेल्या या वक्तव्यांमुळं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

वाचाः देशात शंभर कोटी लसीकरणाचा दावा खोटा, पुराव्यानिशी सिद्ध करू: राऊत

हर्षवर्धन पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात ईडीबाबत एक भाष्य केले होते. त्यानंतर पुन्हा भाजपच्या खासदारांनी ईडीबाबत भाष्य केल्यानंतर ईडीच्या कारवायांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. यावेळी बोलताना खासदार संजय पाटील म्हणाले, मी भाजपचा खासदार आहे. त्यामुळे माझ्या मागे ईडी लागणार नाही. आमची कर्ज पहिली की ईडी म्हणेल, ही माणसं आहेत का काय? खासदार संजय पाटलांनी ईडी बाबत बोलताना माजीमंत्री हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याची आठवण करुन दिली.

वाचाः ‘शाहरुख भाजपमध्ये गेला तर ड्रग्ज नाही, पीठीसाखर सापडली म्हणून सांगतील’

हर्षवर्धन पाटील काय म्हणाले होते?

आम्हालाही भाजपमध्ये जावं लागलं. तो निर्णय मी का घेतला तेवढं मला विचारू नका. ते काँग्रेसच्या नेत्यांना विचारा, असं ते म्हणाले. ‘पण आता भाजपमध्ये मी निवांत आहे. शांत झोप लागते. चौकशी नाही, फिवकशी नाही, काही नाही,’ अशी मिश्किल टिप्पणी पाटील यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये जोरदार हंशा पिकला.

वाचाः समीर वानखेडेंची नोकरी जातेय की मलिकांचे मंत्रिपद ते पाहूया; केंद्रीय मंत्र्यांची टोलेबाजीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: