समीर वानखेडेंवर लाचखोरीचे आरोप; चंद्रकांत पाटलांनी दिली सावध प्रतिक्रिया


हायलाइट्स:

  • समीर वानखेडेंवर लाचखोरीचा आरोप
  • साक्षीदारांकडून करण्यात आले आरोप
  • चंद्रकांत पाटलांनी दिली सावध प्रतिक्रिया

पुणेः आर्यन खान प्रकरणात (aryan Khan drug case) एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांनी आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा धक्कादायक आरोप या प्रकरणातील पहिले साक्षीदार प्रभाकर साईल यांनी केला आहे. प्रभाकर साईल (prabhakar sail) यांच्या आरोपांमुळं राज्यात खळबळ माजली आहे. तर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वानखेडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तर, भाजपनंही या प्रकरणात सावध भूमिका घेतल्याची चित्र आहे.

आर्यन खानच्या अटकेवरुन राज्यात वातावरण तापले असतानाच हा प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट आला आहे. महाविकास आघाडीचे नेते याबाबत आक्रमक झाले आहेत. तर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे. ‘समीर वानखेडे हे भाजपचे कार्यकर्ते नाही त्यामुळं आम्ही त्यांचं समर्थन करण्याचं कारणच नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. जर या प्रकरणी आज काही एनसीबीवर आरोप करण्यात आले आहे. ज्यांनी कुणी केले आहे. त्या आरोप केले असल तर त्याची चौकशी व्हावी, असंही त्यांनी म्हटलं आहे.

वाचाः साक्षीदारांकडून कोऱ्या कागदावर सह्या?; समीर वानखेडे म्हणतात…

‘मी काही एनसीबीचा अधिकारी नाही. एनसीबीने काय करावं काय करु नये यावर मी बोलणार नाही. पण महाविकास आघाडीला शाहरुख खानच्या मुलाचा पुळका का आलाय?, महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहेत त्यावर महाराष्ट्र सरकार काय बोलत नाही. शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न संपले का?,’ असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

समीर वानखेडेंची मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव; कारवाई न करण्याची केली विनंती

समीर वानखेडेंची मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव

समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना एक पत्र लिहीत आपल्यावर कारवाई न करण्याची विनंती केली आहे. मला ड्रग्ज प्रकरणात अडवण्याचा प्रयत्न काही अज्ञात व्यक्तींकडून सुरू आहे. हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे, मात्र काही लोकांकडून मला तुरुंगात टाकण्याच्या आणि नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे माझ्यावर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये,’ असं समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: