… नाहीतर मोहम्मद शमी पाकिस्तानच्या चाहत्याला फटकावणारच होता, व्हिडीओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…


दुबई : पाकिस्तानकडून पराभव झाल्यावर भारतीय संघ पेव्हेलियनमध्ये जात होते. त्यावेळी एका चाहत्याने भारतीय संघाला अशा शब्दांत डिवचले की, मोहम्मद शमीचा राग अनावर झाला. रागाच्या भरात शमी त्याच्या अंगावर धावून गेलाच होता, पण त्यावेळी महेंद्रसिंग धोनी आला आणि त्याने हे प्रकरण सावरले. या गोष्टीचा व्हिडीओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पाकिस्तानचा चाहत्याने नेमकं काय म्हटलं आहे आणि शमीने त्यानंतर काय केलं, हे स्पष्टपणे दिसत आहे.

शमीने आपल्या १८ षटकाती पाच चेंडूंमध्येच १७ धावा दिल्या आणि पाकिस्तानने विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतासाठी ही लाजीरवाणी बाब होती. यापूर्वीही २०१७ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा एक चाहता भारतीय खेळाडूंना डिवचत होता. या चाहत्याने पहिल्यांदा कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केले. विराट, तुझा अहंकार आता तुटला आहे, असं हा चाहता म्हणत होता. त्यानंतर काही वेळाने, ‘बाप कौन हैं…. बाप….’ असं हा चाहता म्हणत होता. त्यावेळी हे शब्द मोहम्मद शमीने पेव्हेलियनमध्ये जाताना ऐकले आणि तो चिडल्याचे पाहायला मिळाले. शमी फक्त तेवढ्यावरच थांबला नाही तर तो त्या पाकिस्तानी चाहत्याच्या जवळही गेला. आता शमी काही तरी करणार, असं वाटत असतानाच महेंद्रसिंग धोनी तिथे आला आणि त्याने शमीला आपल्याबरोबर पेव्हेलियनमध्ये नेले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. कारण शमीने त्यावेळी जर चाहत्यावर आपला राग काढला असता तर त्यावेळी बऱ्याच वाईट गोष्टी घडू शकल्या असत्या. रविवारी झालेल्या सामन्यानंतर शमीला चाहत्यांनी सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर काही चाहत्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. भारताचा माजी धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही हा व्हिडीओ शेअर केला आहे.
सेहवागने हा मोहम्मद शमीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर शमी आम्ही सर्व तुझ्याबरोबर आहोत आणि पुढच्या सामन्यात तु जलवा दाखवशील, असेही म्हटले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: