स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अभिजीत धनंजय पाटील यांना पाठिंबा जाहीर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अभिजीत धनंजय पाटील यांना पाठिंबा जाहीर

माढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/११/२०२४- माढा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज सकाळी भीमानगर येथे बैठक झाली, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाचा योग्य काटा व उच्चांकी दर देण्याचे तीन वर्षे झाली काम करत असलेले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि माढा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत धनंजय पाटील यांना एकमुखी पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे.

यावेळी स्वाभिमानीचे नेते विठ्ठलचे संचालक सचिन पाटील, ज्येष्ठ नेते शिवाजी पाटील, युवा नेते प्रशांत पाटील, अजिनाथ परबत, प्रताप पिसाळ, सत्यवान गायकवाड,अतकरे सर, विष्णु कुंभार,आबा कुंभार तसेच संजय कोकाटे, नितीन कापसे, बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top