ramdev baba : रामदेव बाबांना झटका! अॅलोपॅथी वादावर दिल्ली हायकोर्टाने बजावली नोटीस
या प्रकरणात समन्स बजावण्यात आल्यावर आपल्याला कोणताही आक्षेप नाही. पण त्यांनी आरोपांना विरोध केला. या वादाचे तीन भाग आहेत. लसीकरणाविरुद्ध कोरोनिल, बदनामी आणि गोंधळ. केवळ मानहानीच्या प्रकरणात न्यायालय नोटीस बजावू शकतं, असं रामदेव बाबांचे वकील नायर म्हणाले.
‘मी कोणताही आदेश देत नाही. कृपया तुमचा लेखी जाबब दाखल करा आणि या प्रकरणात कोणतीही खटला दाखल केला जाऊ शकत नाही, असं म्हणा. रामदेव बाबांसह आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली आयुर्वेद यांनाही याप्रकरणी समन्स बजावून उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे. कोर्टाने गुगल, फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनाही नोटीस बजावली आहे.
rahul gandhi : ‘पेगाससला मंजुरी PM मोदींनी दिली की गृहमंत्री शहांनी?’, राहुल गांधींचा बोचरा सवाल
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ऋषिकेश, पाटणा आणि भुवनेश्वर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस तीन निवासी डॉक्टर्स असोसिएशनसह चंदिगड पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चचे निवासी डॉक्टर्स असोसिएशन, पंजाबचे निवासी डॉक्टर असोसिएशन; लाला लजपत राय मेमोरियल मेडिकल कॉलेज, मेरठ आणि तेलंगण ज्युनियर डॉक्टर्स असोसिएशनच्या निवासी डॉक्टर्स असोसिएशनने या वर्षाच्या सुरवातीला हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
रामदेव जनतेची दिशाभूल करत आहेत आणि करोना संसर्ग झालेल्या अनेकांच्या मृत्यूसाठी अॅलोपॅथी जबाबदार असल्याचा खोटा अंदाज लावत आहेत, असा आरोप याचिकेतून संघटनांनी केला आहे.