भ्रष्टाचाराचा डाग असूनही ललीत मोदींची लंडनमधून चिखलफेक, नव्या आयपीएल संघावर केला हा गंभीर आरोप


नवी दिल्ली : ललीत मोदी यांनीच आयपीएल सुरु केली, पण त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यावर त्यांनी भारतामधून पळ काढला. पण आता तेच मोदी लंडनमध्ये बसून बीसीसीआयवर चिखलफेक करत आहेत. कारण आयपीएलमधील एका नवीन संघावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
ललीत मोदी यांनी नेमके कोणते गंभीर आरोप केले, पाहा…
आयपीएलमध्ये लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ दाखल झालेले आहेत. यावेळी अहमदाबादचा संघ सीव्हीसी कॅपिटल्स या कंपनीने विकत घेतला आहे. या कंपनीचे संबंध सट्टेबाजीबरोबर आहे. कारण या कंपनीची पैशांची गुंतवणूक सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीबरोबर आहेत. सीव्हीसी या कंपनीने तब्बल ५६२५ कोटी रुपये खर्च करत अहमदाबादचा संघ विकत घेतला आहे.

मोदी यांनी यावेळी सांगितले आहे की, ” मला वाटतं की, सट्टेबाजी करणाऱ्या कंपनीदेखील आता आयपीएलमध्ये संघ विकत घेऊ शकतात. माझ्यामते हा नवीन नियम असावा. बोली जिंकणारी व्यक्ती एका सट्टेबाजी कंपनीचा मालकही आहे. आता पुढे काय होणार, बीसीसीआयने आपले काम चोख केले नाही का? भ्रष्टाचारविरोधी पथक याबाबत नेमकं काय करणार आहे.”

आयपीएलचे दोन नवीन संघ पुढच्या मोसमात खेळणार आहे. या नवीन संघांसाठी बीसीसीआयने निविदा मागवल्या होत्या. निविदा पाठवणाऱ्यांमध्ये अदानी ग्रुपपासून ते मँचेस्टर युनायडेटपर्यंत बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या, उद्योगपती आणि संस्थांनी निवादा पाठवल्या होत्या. यामधून दोन निविदा निवडण्यात आल्या. त्यानुसार उद्योगपती संजीव गोएंका यांनी सर्वाधिक ७१०० कोटी रुपये मोजत लखनौचा संघ विकत घेतला आहे. काही वर्षांपूर्वी संजीव गोएंका यांनी आयपीएलमधअये पुण्याचा संघ विकत घेतला होता. पण दोन वर्षेच हा संघ आयपीएलमध्ये खेळला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा गोएंका यांनी आयपीएलमध्ये एंट्री झाली आहे. त्याचबरोबर सीव्हीसी कॅपिटल्स या इक्विटीमधील कंपनीने ५६०० कोटी रुपये मोजत अहमदाबादचा संघ आपल्या नावावर केला आहे. ही कंपनी सट्टेबाजी करत असल्याचा आरोप आता ललीत मोदी यांनी लगावला असून त्यांनी याबाबत बीसीसीआयला प्रश्न विचारला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: