खर्डी येथे ग्रामसभा संपन्न , आलेल्या ठरावांना बहुमताने संमती

खर्डी तंटामुक्ती अध्यक्षपदी मीनानाथ खताळ

खर्डी /अमोल कुलकर्णी – जिल्हा ग्रामीण तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे ग्रामसभा संपन्न झाली. कोरोना काळामुळे तब्बल अडीच वर्षानंतर ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी अनेक विषय विकासकामे यांना मंजुरी देण्यात आली.यामध्ये प्राधान्याने प्राथमिक शाळेचे बांधकाम जागा घेऊन करणे, रास्तभाव सामान दुकानाचे व्यवस्थापन,भाविकांसाठी, महिलांना सिमेंट मुताऱ्या बांधणे, वाड्या-वस्त्या वरील रस्त्यांचे मुरमीकरण करणे आणि विविध कृषी पूरक उद्योगांची चर्चा करण्यात आली.

याच सभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी एकच अर्ज आल्याने इतरांनीही आपली नावे आयत्या वेळी दिली. यामध्ये अंतिम दोन नावे शिल्लक राहिली. यातून मीनानाथ खताळ यांची बहुमताने निवड झाली तर अँड मोहन रोंगे यांचा पराभव झाला.

  ग्रामसभेमध्ये खाजगी दारू विक्री परवानाच्या दुकानासह बियर शॉपीची देखील मागणी करण्यात आली. तसेच घरकुल आणि शौचालय याबाबत ही चर्चा करण्यात आली.वीज महामंडळ यांच्याकडून होत असलेल्या त्रासाबद्दल विविध तक्रारींचे उत्तर देण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. पशुधन विकास वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 यांच्यामार्फत शेतकरी व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले इंदिरानगर येथील रिकाम्या जागेमध्ये संविधान भवन बांधण्यास संदर्भात आलेल्या ठरावाला बहुमताने संमती देण्यात आली. ग्रामसभेवेळी ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित नव्हते. उपसरपंच शरद रोंगे,नूतन ग्रामसेवक बी व्ही कुलकर्णी, माजी ग्रामसेवक अमर मकर आदींसह ग्रामस्थ ,ग्रामपंचायत सदस्य व सर्व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. यानंतर महिलांची विशेष ग्रामसभा घेऊन दारू विक्री दुकान आणि इतर विषयांवर चर्चा घेण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच,उपसरपंच यांच्याकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: