इंदिरा गांधींची पुण्यतिथी; राहुल म्हणाले, ‘माझ्या आजीने अखेरच्या क्षणापर्यंत देशसेवा केली’


नवी दिल्लीः दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना यांची आज पुण्यतिथी. काँग्रेसने रविवारी इंदिरा गांधींना आदरांजली वाहिली. इंदिरा गांधी या नारीशक्तीचे सर्वोत्तम उदाहरण आहेत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. १९८४ मध्ये आजच्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबरला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या दोन अंगरक्षकांनी हत्या केली होती.

इंदिरा गांधींना आदरांजली वाहत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. ‘माझ्या आजीने अखेरच्या क्षणापर्यंत निर्भयपणे देशाची सेवा केली – त्यांचे जीवन आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. नारीशक्तीचे उत्तम उदाहरण असलेल्या इंदिरा गांधींना त्यांच्या हौतात्म्यदिनानिमित्त विनम्र आदरांजली, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

काँग्रेसनेही ट्विट करून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींना आदरांजली वाहिली. इंदिरा गांधींनी देशासाठी मोठे योगदान दिले. त्यांनी शक्तीचे प्रतिनिधित्व केले. त्या त्यागाचे प्रतीक आहेत, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

सरदार वल्लभभाई पटेल जयंती; PM मोदी, शहांनी वाहिली आदरांजली, शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल

इंदिरा गांधींनी सेवेचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या आयर्न लेडी, आपल्या पहिल्या महिला पंतप्रधान, खऱ्या भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

Ashok Gehlot: मी जादूगार, म्हणून चालला खेळ; मुख्यमंत्र्यांचं वक्तव्यSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: