नवाब मलिकांनी उल्लेख केलेला तो व्यक्ती कोण?; राणेंनी दिलं प्रत्युत्तर


हायलाइट्स:

  • नवाब मलिकांकडून देवेंद्र फडणवीस लक्ष्य
  • कथित निकटवर्तींवरुन मलिकांचा आरोप
  • नारायण राणेंनी दिलं प्रत्युत्तर

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) व एनसीबीचे संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका अद्याप सुरुच आहे. नवाब मलिक यांनी या प्रकरणात आता थेट देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावरही निशाणा साधला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्तीय नीरज गुंडे हा एक दलाल असून, तो सध्या वारंवार अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या (एनसीबी) कार्यालयात जातो, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिकांच्या या आरोपांवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane)यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

वानखेडे यांचा संबंध देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गुंडे याच्याशी आहे. गुंडे कुणाचे पैसे कुठे लपवतो, हे मला माहिती आहे. त्याच्या चेंबूरच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचे. विविध सचिवांकडे त्याचे जाणे-येणे होते. ‘वर्षा’वर त्याचा वावर असायचा. रश्मी शुक्ला प्रकरणातदेखील तो गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. त्यामागे कारण आहे. काशिफ खान, मोहित कंबोज आणि कॉर्डियला क्रूझचा एकमेकांशी संबंध आहे. याबाबत लवकरच माहिती देऊ. त्यानंतर भाजपच्या नेत्यांना राज्यभरात तोंड दाखवता येणार नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

वाचाः परमबीर सिंह बेल्जियममध्ये?; काँग्रेस नेत्याच्या ट्वीटने खळबळ

नवाब मलिक यांच्या आरोपांवर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. गुंडे याच्यावर केलेल्या मलिक यांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले. ‘चेंबूरमधील ती व्यक्ती आमचा मित्र नाही, तर कार्यकर्ता आहे. माझे आयुष्य चेंबूरमध्ये गेले आहे. तो दोन नंबरवाल्यांची माहिती देतो. भुजबळ यांना अटक का झाली? भुजबळ तीर्थयात्रेला गेले होते का? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे.

वाचाः समीर वानखेडे यांचा निर्णय महासंचालकांच्या हाती

नवाब मलिक यांनी अधिवेशनात भाजपला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा शब्दांत भाजपवर टीका केली होती. त्यावर बोलताना राणेंनी अधिवेशन म्हणजे काय, कोणाचे अधिवेशन, अधिवेशनात काय फासावर लटकवणार का? आमचेही १०५ आमदार आहेत. समीर वानखेडेंनी काय केलं?, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी करतात. मंत्र्यांनी हजारो कोटी कुठून आणले? भ्रष्टाचारच केला नाही, त्यामुळं लागू द्या मागे, असं म्हणत राणेंनी नवाब मलिकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

वाचाः
‘आमच्या घराची तिघांनी रेकी केली आहे, याबाबत काही केलं जावं’; क्रांती रेडकर यांची मागणीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: