patna serial blasts : नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या ४ दोषींना फाशी


पाटणाः पाटणा येथील गांधी मैदानावर २०१३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयए कोर्टाने सोमवारी दोषींना शिक्षा जाहीर केली. ऐतिहासिक निकाल देताना एनआयए कोर्टाने ४ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

बरोबर ८ वर्षांनी आला निकाल

हा एक योगायोगच म्हणावा. पटनामध्ये २७ ऑक्टोबर २०१३ ला साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. बरोबर ८ वर्षानंतर कोर्टाने २७ ऑक्टोबर २०२१ ला या प्रकरणी निकाल दिला. बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ८ वर्षांनंतर कोर्टाने ९ आरोपींना दोषी ठरवले. या प्रकरणी सोमवारी कोर्टाने ४ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्याच वेळी २ दोषींना जन्मठेपेची आणि २ दोषींना १० वर्षांची तर एका दोषीला ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाटणाच्या NIA कोर्टाचा हा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय.

या दोषींना फाशीची शिक्षा झाली

१. हैदर अली
२. नोमान अन्सारी
३. मो. मुजिबुल्ला अन्सारी
४. इम्तियाज आलम

या दोन दोषींना जन्मठेप

१. उमर सिद्दीकी
२. अझरुद्दीन कुरेशीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तर अहमद हुसेन आणि मो. फिरोज अस्लम या दोन दोषींना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आणि इफ्तिखार आलमला या दोषीला ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पाटणा येथील ऐतिहासिक गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० वरही बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. तर ८० हून अधिक जण जखमी झाले होते.

sameer wankhede : समीर वानखेडे पुन्हा दिल्लीत धडकले, अनुसूचित आयोगाकडे सादर केली कागदपत्रे, आयोग तक्रारींची चौकशी करणार

१८७ जणांनी दिली होती साक्ष

या प्रकरणात एकूण १८७ जणांनी कोर्टात साक्ष दिली. एनआयएच्या विशेष कोर्टाने बचाव पक्ष आणि सरकारी वकिलांनी दिलेल्या लेखी युक्तिवादानंतर ६ ऑक्टोबरला निकालाची तारीख २७ ऑक्टोबर निश्चित केली होती.

PM Narendra Modi: लसीकरण ५० टक्क्यांहून कमी, पंतप्रधान मोदींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बै

पंतप्रधान मोदींच्या हुंकार रॅलीतील स्फोट प्रकरणाचा तपास करणाऱ्या NIA पथकाने २०१४ मध्ये रांचीतील मुख्य आरोपी इम्तियाज अन्सारी याच्यासह १० जणांविरुद्ध NIA कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. सध्या सर्व आरोपी बेऊर तुरुंगात आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: