‘दिवाळीनंतर गौप्यस्फोट होतील, तेव्हा त्यांना बाथरुममध्ये तोंड लपवून बसावे लागेल’


हायलाइट्स:

  • केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर महाविकास आघाडी
  • शिवसेना खासदार संजय राऊतांचा संताप
  • संजय राऊतांनी दिला थेट इशारा

मुंबईः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल रात्री उशीरा महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अटक केली आहे. तर, अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मालमत्तांवर आता आयकर विभागानं कारवाई केली आहे. एकापाठोपाठ महाविकास आघाडीवर हल्ले होत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘अनिल देशमुखांची अटक दुर्देवी आणि कायद्याला आणि नितीमत्तेला धरुन नाहीये. अनिल देशमुखांवर आरोप करणारे पळून गेलेले नाही त्यांना पळवून लावले आहे. जे देशाबाहेर पळून गेले आहेत तो केंद्रीय सत्तेच्या मदतीने पळून जाऊ शकतो. मुंबई पोलस खात्याचा एक अधिकारी जेव्हा देश सोडून जतो. तेव्हा त्याला केंद्रीय सत्तेचे पाठबळ असते. त्यांनी आरोप केला आणि पळून गेले. त्याने केलेल्या आरोपांनुसार केंद्रीय यंत्रणा अटक करतेय. चौकशी तपास होऊ शकतो मात्र, पहिल्याच भेटीत अटक करणं चुकीचं आहे. त्रास देण्याचा हा प्रकार मुद्दाम केला जातोय. हे सगळ ठरवून केलं जातंय. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे,’ असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

‘अजित पवारांच्या संपत्तीवर जप्ती आणली जाते. मग, भाजपचे लोक जंगलात राहतात का? की त्यांच्या काहीच संपत्ती नाही आणि त्या वैध मार्गाने आहेत का?, असा सवाल करतानाच त्यांची माहिती आ्ही केंद्रीय यंत्रणांना दिली आहे मात्र, त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही. त्यांची बायकापोरं म्हणजे कुटुंब आणि आमची रस्त्यावर राहातता का? हे घाणेरडं राजकारण त्यांच्यावर उलटल्याशिवाय राहणार नाही आणि आज टणाटण उड्या मारणाऱ्यांना उद्या तोंड लपवावं लागेल,’ असा इशारा संजय राऊतांनी दिला आहे.

‘दिवाळी नंतर असं करु तसं करु, म्हणणारे हे लोक घरात बाथरुममध्ये तोंड लपवून बसतील, असे गौप्यस्फोट दिवाळीनतंर होतील. पण करायचे का आम्ही? तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचे का? असा सवाल राऊत यांनी केला. आम्हाला आमच्या नेत्यांनी राजकारणात असं शिकवलं नाही. आपण हिन पातळी ओलांडायची नाही. हे सगळं राजकीय षड्यंत्र आहे जे मी सुद्धा भोगलंय. ज्यांच्यामुळे भाजप सरकार सत्तेवर आलं नाही त्या सगळ्यांना त्रास दिला जातोय. जे लोकं भाजपच्या अमिषाला, दबावाला बळी पडत नाहीये त्याना त्रास दिला जातोय. मात्र कितीही त्रास दिला अटका सटका केल्या तरी त्यांचं सरकार सत्तेत येणार नाही,’ असाही दावा त्यांनी केला आहे.

समन्स द्यायला अनिल देशमुख आणि आम्हीच आहोत का. खडसे, नवाब मलिकांचाचा जावई आहे का अटक व्हायला? आम्ही पण त्यांच्याकडे यादी दिली आहे. इतरांचे नातेवाईक का दिसत नाही? हे क्रुर लोकं आहेत. राक्षस गणातील लोकं आहेत. हे हिंदुत्वाचे नाव घेतात. पण हिंदुत्वाची व्याख्या अशी नाहीये. कितीही उड्या मारा आणि नाचत राहा. २०२४ नंतर भेटू. त्यानंतर जे होणार आहे ते पाहू. मग बघा केंद्रीय तपास यंत्रणा कुणापुढे गुडघे टेकतात ते. तेव्हा तुम्ही भूमिगत होऊ नका. तुमच्याही फाईली तयार आहेत. तुमच्याही कुटुंबाच्या संपत्ती आहेत. कशा प्रकारे आणि कुठे आहेत हे आमच्याकडे आहे,’ असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: