जयंत पाटील हेच आम आदमीच्या परिवर्तनाचे खरे परिस कार्ड
जयंत पाटील हेच आम आदमीच्या परिवर्तनाचे खरे परिस कार्ड

आटपाडी, दि.०१/११/२०२१,प्रतिनिधी - जयंत पाटील हेच आम आदमीच्या सर्वांगीण आणि चौफेर परिवर्तनाचे खरे परिस कार्ड आहेत असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस च्या अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे महासचिव सादिक खाटीक यांनी येथे बोलताना काढले .
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा इंजिनियर सौ.अनिताताई पाटील यांच्या विद्यमाने विविध क्षेत्रातील कामगार बंधु भगिनींच्या मेळाव्याचे आयोजन पंचायत समिती आटपाडीच्या सभागृहात करण्यात आले होते .त्यावेळी ते बोलत होते .
सर्व क्षेत्रातल्या कामगारांना लाभदायी ठरणाऱ्या स्मार्ट कार्ड चे वाटप तसेच कामगारांच्या विविध गरजा लक्षात घेऊन विविध वस्तु कपडे औजारांची बनविलेली पेटी इंजिनियर सौ.अनिता पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली .
लोकनेते राजारामबापू पाटील ज्ञान प्रबोधिनी इस्लामपूर च्या माध्यमातून ना.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुक्यात राबविल्या जाणाऱ्या जयंत दारीद्र निर्मलनाच्या उपक्रमातून २००६ सालापासून २०१८ पर्यत आणि त्यानंतर आजअखेर ४८३९५ लोकांना ३९ कोटी ९१ लाख १३ हजार ५३५ रुपयांच्या सेवेचा लाभ मिळवून देत महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला गेला आहे . हृदयविकार शस्त्रक्रिया,कर्करोग,मधुमेह, महिलांचे विविध आजार यासह इतर अनेक आजारांवरील उपचार शासनाच्या विविध योजनांचा आधार घेत मोफत तपासणी व औषधोपचार प्रसंगी शस्त्रक्रिया करून अशी सेवा दिली जात आहे.या अभियानाचे माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत . भारत सरकारच्या श्रम आणि कामगार कल्याण मंत्रालय यांचे छोट्या छोट्या उद्योग व्यवसाया करीता महिला मेळावे, वगैरे बाबींचा या सर्व सोयी सुविधांचा लाभ आटपाडी तालुक्याला होण्यासाठी जयंत दारीद्रय निर्मूलन अभियानची आटपाडीत शाखा होणे अत्यंत गरजेचे आहे . इंजिनियर अनिताताई पाटील, प्रा.एन.पी.खरजेंसह मी यासाठी जयंत पाटील यांच्याकडे प्रयत्न करेन असे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .

जयंत पाटील यांना मोठी ताकद मिळविण्यासाठी अनिता पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे . शेतकरी आणि कामगार या देशाच्या खऱ्या मालकाची अवस्था पिढ्यान् पिढ्याच्या व्यवस्थेने पोतराजासारखी केली असून देशाच्या या खऱ्या मालकांना राजा बनविण्यासाठी सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नांची गरज असल्याचेही सादिक खाटीक यांनी सांगितले .
बांधकाम कामगार शेतकरी ,मजूर ,घरकाम करणाऱ्या महिला परितक्त्या या तळागाळातील लोकांपर्यत शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच इतर कोणत्याही अडीअडचणींसाठी त्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना सहकार्य करण्याची ग्वाही मेळाव्याच्या संयोजक सौ.अनिताताई पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि जयंतराव पाटील हेच आपल्या चौफेर कार्याचे मुख्य स्त्रोत सुत्र असल्याचे स्पष्ट केले .
कामगारांना मिळणाऱ्या विविध शासकीय योजनांची विस्तृत माहीती सांगून अनिताताई पाटील यांच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे रहावे . उद्याच्या जि.प. सदस्या म्हणून अनिता पाटील जिल्ह्यावर कार्यरत झाल्या पाहिजेत त्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करू या असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा.एन.पी.खरजे यांनी केले.
विशाल बडवे यांनी उपक्रमाची माहिती दिली . यावेळी प्रा.शरयू पुजारी, महिला राष्ट्रवादीच्या तालुका उपाध्यक्षा सौ.आशाताई देशमुख, राष्ट्रवादीच्या सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, सौ.पुजा सुजित सपाटे, धनंजय सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. अनिता पाटील यांनी आभार मानले .