राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यक्रम संपन्न

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यक्रम संपन्न…

आंधळगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०५/२०२५-आज दि.16 मे 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला.समाजात डेंग्यू आजाराविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र आंधळगाव येथील आरोग्य सहाय्यक मनोहर पाटील यांनी डेंग्यूचा प्रसार व प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल मार्गदर्शन केले. 

यावेळी मनोहर पाटील म्हणाले की डेंग्यू हा आजार  एडिस इजिप्ती या प्रजातीच्या मादी डासाच्या चावल्यामुळे होतो.या डासाची मादी ही स्वच्छ पाण्यात अंडी घालते त्यातून अंडी-अळी-कोश आणि डास उत्पत्ती होते जसे की बॅरल,हौद,पिंप,पाण्याच्या टाक्या,फ्रिज,कुलर्स,फुलदाणीच्या कुंड्या,निरुपयोगी टायर्स यामध्ये साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डासाची मादी अंडी घालते आणि त्यातून डास उत्पत्ती होऊन निरोगी माणसांना चावल्याने डेंग्यू आजार होतो.डेंग्यू आजारात थंडी वाजून ताप येणे,डोकेदुखी,अंगदुखी, सांधेदुखी,उलटी,मळमळ,अशक्तपणा,भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे,अंगावर पुरळ येणे,हिरड्यातून रक्त पडणे अशी लक्षणे आढळून येतात.

हा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून घरगुती वापरातील पाण्याच्या टाक्या,बॅरेल,हौद आठवड्यातून एकदा कोरडे करा.स्वच्छ पुसून कोरडे करूनच त्यामध्ये पाणी भरा.आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळा.भंगार सामान निरुपयोगी टायर्स ची विल्हेवाट लावा.कुलर-फ्रीजच्या ड्रिपपॅन मधील पाणी,फुलदाण्यातील पाणी काढून टाका.बॅरल मधील पाणीसाठी झाकून ठेवा.व्हेंटिे पाईपला जाळी बसवा. जेणेकरून डास उत्पत्ती होणार नाही याबाबत काळजी घ्या.ताप अंगदुखी डोकेदुखी जाणवल्यास लगेच सरकारी दवाखान्यात जाऊन औषध उपचार घ्या.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.माधुरी कदम,डॉ.चंदन रासकर,आरोग्य निरीक्षक श्रावण मोरे,आरोग्य सहायिका,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.आरोग्य सेवक रणजीत लेंडवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच आरोग्य सेवक सोमनाथ कारदगे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Back To Top