मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आचारसंहिता भंग प्रकरणी काँग्रेस तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल: चौकशीसाठी प्रकरण MCGM आयुक्तांकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्या आचारसंहिता भंग प्रकरणी काँग्रेस Congress Complaint तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून
ElectionCommission दखल; चौकशीसाठी प्रकरण MCGM आयुक्तांकडे

मुंबई मेट्रोत दिलेल्या मुलाखतीवर आक्षेप; फडणवीसां विरोधातील congress काँग्रेसची Model Code Of Conduct तक्रारीची निवडणूक आयोगाने घेतली दखल

निवडणूक काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रचारासाठी वापर केल्याचा आरोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील काँग्रेस तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल.

जगदीश का काशिकर – मुक्त पत्रकार मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज – निवडणूक आचारसंहिता लागू असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रचारासाठी वापर केल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत दखल घेतली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी आयोगाने सदर प्रकरण मुंबई महानगरपालिका (MCGM) आयुक्तांकडे सुपूर्द केले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी दिली.

काँग्रेसकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार २ जानेवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रो रेल्वे परिसरात एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत ही निवडणूक आचारसंहितेचा स्पष्ट भंग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुलाखतीचा वापर प्रचारात्मक स्वरूपात करण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीसोबत संबंधित व्हिडीओ पुरावे, घटनाक्रम तसेच कायदेशीर मुद्द्यांचा तपशील सादर करण्यात आला होता. त्याची प्राथमिक छाननी केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने MCGM प्रशासनाला अधिकृत ई-मेलद्वारे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.या ई-मेलची प्रत तक्रारदार काँग्रेस पक्षालाही पाठवण्यात आली आहे.

प्रदेश काँग्रेस कमिटी प्रदेश सरचिटणीस धनंजय शिंदे

तक्रारीतील प्रमुख मुद्दे

निवडणूक काळात मुंबई मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रचारासाठी वापर,शासकीय यंत्रणेच्या संभाव्य गैरवापराचा संशय,वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह विशेष व असमान सुरक्षा बंदोबस्त,माध्यमांसमोर प्रचारात्मक स्वरूपाची मुलाखत.हे सर्व मुद्दे निवडणूक प्रक्रियेतील समान संधी, निष्पक्षता आणि लोकशाही मूल्यांशी थेट संबंधित असल्याचे काँग्रेसकडून नमूद करण्यात आले आहे.

काँग्रेसची भूमिका

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे म्हणाले,निवडणूक काळात मुख्यमंत्री स्वतः सार्वजनिक मालमत्ता आणि शासकीय यंत्रणेचा प्रचारासाठी वापर करत असतील, तर तो आचारसंहितेचा गंभीर भंग आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे.पद कितीही मोठे असले तरी नियमांचे पालन बंधनकारक आहे. या प्रकरणात निवडणूक आयोगाने उदाहरणार्थ आणि कठोर कारवाई करावी.

पुढील घडामोडी

सदर प्रकरण सध्या सक्षम प्राधिकरणाकडे विचाराधीन असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहील, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Back To Top