शिवसेना स्वबळावर लढत आहे, हलक्यात घेऊ नका: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा

शिवसेना Shivsena स्वबळावर लढत आहे, हलक्यात घेऊ नका: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा dcm Eknath Shinde विरोधकांना इशारा

पुणे महापालिका निवडणूक प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना थेट इशारा.शब्द शिवसेनेचा वचननाम्याचे प्रकाशन,लाडकी बहीण योजना सुरूच राहणार,प्रॉपर्टी टॅक्स सवलतीचे आश्वासन.

Pune mahanagarpalika election पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.९ जानेवारी २०२६ : महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आले होते.कात्रज,संत कबीर चौक व कसबा पेठ येथे शिवसेना, रिपब्लिकन सेना व पतित पावन संघटनेच्या संयुक्त युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभांमध्ये त्यांनी जोरदार भाषण केले.

यावेळी विरोधकांना थेट इशारा देताना शिंदे म्हणाले,शिवसेना स्वबळावर लढत आहे.कुणीही आम्हाला हलक्यात घेऊ नका.बाळासाहेबांचे वाघ डरपोक राजकारणाला कधीच घाबरत नाहीत. शिवसेना ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारी नसून संघर्षातून उभी राहिलेली पक्षसंस्था असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

या कार्यक्रमात शिवसेना पक्षाचा शब्द शिवसेनेचा हा वचननामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.यावेळी शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार तानाजी सावंत,माजी आमदार रवींद्र धंगेकर, शहरप्रमुख नाना भानगिरे, जिल्हा प्रमुख रमेश कोंडे,अजय भोसले,युवासेना प्रदेश सचिव किरण साळी,आबा बागुल,नमेश बाबर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले,मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली. अनेकांनी विरोध केला, मात्र कितीही अडथळे आले तरी ही योजना बंद होणार नाही.या योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

५०० चौरस फुटांपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स सवलत

नगरविकास मंत्री म्हणून ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा प्रॉपर्टी टॅक्स रद्द करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “फक्त घोषणा नाही तर आम्ही प्रत्यक्ष काम करणारे आहोत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

वाहतूक आणि विकासावर भर

चांदणी चौकातील ट्रॅफिक कोंडी दूर केल्याचे उदाहरण देत कात्रज परिसरातील वाहतूक समस्याही लवकरच सोडवण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले. पुणे शहराचा विकास नगरविकास, म्हाडा व विविध विभागांच्या माध्यमातून गतीने केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना कात्रजचा घाट दाखवणार – उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले,कात्रज मध्ये सभा घेतली कारण विरोधकांना कात्रजचा घाट दाखवायचा आहे. ही लढाई धनशक्ती विरुद्ध शिवशक्तीची आहे.त्यांनी कात्रज परिसरातील ड्रेनेज लाईनसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली आणि मतदारांना धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले.

महिला सुरक्षा व नागरी सुविधा प्राधान्यक्रमात – डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शहरातील वाहतूक सुधारणा,पाणी पुरवठा,महिला सुरक्षा आणि सामाजिक योजनांना प्राधान्य देण्यात येईल,असे आश्वासन दिले.

Leave a Reply

Back To Top