शिवसेना युवासेना पदाधिकार्यांनी आयसीसीच्या प्रतिकृतीला फासले काळे
शत्रुदेशाबरोबर सामना खेळण्यास लावून देशप्रेमाचा केला लिलाव – युवासेना उपसचिव रणजीत बागल यांचा घणाघात

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज –भारत पाक दरम्यान सामना खेळवला जात आहे मात्र यावर देशातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे त्यातच शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझे कुंकू माझा देश हे आंदोलन करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार गावागावातील महिलांनी केंद्र सरकारला कुंकू पाठवण्याचे आंदोलन केले.त्याचबरोबर युवासेनेच्यावतीने पंढरपूर येथे आयसीसी क्रिकेट असोसिएशन च्या प्रतीकात्मक प्रतिमेला काळे फासण्यात आले सोबतच घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी बोलताना युवासेना उपसचिव तथा सडेतोड वक्ते रणजीत बागल बोलताना म्हणाले की, आज सत्ताधार्यांनी देशातील सर्वसामान्य जनतेच्या भावनांचा खेळ केला आहे. भारत देशाचा शत्रू देश असलेल्या पाकिस्तानसोबत सामना खेळण्यास प्रवृत्त करुन आसीसीआय व बीसीसीआय ही आपल्या देशातील जनतेचा अवमान करत आहे आणि दुर्दैवाची बाब म्हणजे या सर्व गोष्टीं होतं असताना केंद्र सरकार काहीही बोलायला तयार नाही. केंद्र सरकार झोपले आहे का असा सवाल देखील बागल यांनी यावेळी उपस्थित केला.सरकारने हे सर्व घडण्याआधी शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या भावनांचा विचार करायला हवा होता मात्र या केंद्र सरकारने देशभक्तीचा देखील या सामन्याच्या निमित्ताने एक प्रकारे लिलावच केला आहे अशी टिकाही बागल यांनी केली.

यावेळी युवासेनेचे आकाश माने, उपजिल्हा प्रमुख युवासेना आनंद घोडके,शहरप्रमुख युवासेना महेश यादव, शिव आरोग्य सेना ता.सचिव महेश हिंगमिरे,सुरज सातपुते , गणेश निंबाळकर ,सौरभ कवडे ,वैभव थिटे, श्रीकांत महिमकर, धनराज माळी,नाथा कांबळे ,विठ्ठल पवार, विशाल पवार ,सुनिल लोखंडे ,आबा चौगुले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.