मिशन स्वाभिमान विशेष कर संकलनात सिध्देवाडी ग्रामपंचायतींचा विशेष सन्मान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

मिशन स्वाभिमान विशेष कर संकलनात सिध्देवाडी ग्रामपंचायतींचा विशेष सन्मान

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज:मिशन स्वाभिमान विशेष कर संकलनात पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी ग्रामपंचायतींचे सरपंच रोहिणी सारंग जाधव यांचा विशेष सन्मान अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांचे हस्ते करणेत आला. ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मिशन स्वाभिमान ही विशेष कर संकलन मोहीम जिल्हा परिषद सोलापूर मार्फत राबविण्यात येत आहे.या मोहिमेत उत्कृष्ठ करसंकलन केलेल्या ६६ ग्रामपंचायतीचा गौरव जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या समारंभाचे आयोजन करणेत आले होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक तालुक्यातील 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या तीन ग्रामपंचायती व 3000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तीन ग्रामपंचायतींना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सुर्यकांत भुजबळ , मुख्य लेखा व वित्त अधिकारी वर्ग (१) मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन स्मिता पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे,पं.स उत्तर सोलापूर चे सहाय्यक गट विकास अधिकारी चे बी.सी. पाटील,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच रोहिणी सारंग जाधव , माजी उप सरपंच ज्ञानेश्वर गडदे,गव्हर्नमेंट काॅन्ट्रॅक्टर सारंग जाधव, ग्रामपंचायत सदस्य सिध्देश्वर जाधव,रमेश बनसोडे, सुरेश गोडसे, तंटामुक्त अध्यक्ष समाधान जाधव,विजय जाधव, अतुल जाधव,रावसाहेब भोपळे यांनी हा पुरस्कार स्विकारला.

विशेष कर संकलन दिन या मोहिमेअंतर्गत दि.१४ ऑक्टोबर २०२५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विशेष कर संकलन दिनाचे आयोजन करण्यात आले आले.प्रास्तविक भाषणात उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ यांनी केले. मिशन स्वाभिमान कार्यक्रमाचे संचालन शिवराज राठोड, सुहास चेळेकर यांनी केले.आभार सचिन जाधव यांनी मानले.

घरकुलाचा कामे प्राधान्याने पुर्ण करून सोलापूर जिल्हा राज्यात अग्रणी ठेवा- अति.सिईओ संदीप कोहिणकर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मध्ये आपल्या जिल्हातील ग्रामपंचायतीचा राज्यात पहिल्या क्रमांक मिळवणे हे आपले अंतिम ध्येय असून यासाठी जिल्हा प्रशासन आपणास सहकार्य करण्यास तयार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे संकल्पनेतील या अभियानात सोलापूर जिल्हा राज्यात अग्रभागी ठेवा.यासाठी जिल्ह्यातील घरकुलांची कामे देखील प्राधान्याने पुर्ण करा असेही संदीप कोहिणकर यांनी सांगितले.

लोकवर्गणीसाठी विशेष अभियान राबविणार – उप मुख्यकार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मिशन स्वाभिमान विशेष कर संकलन मोहीम हे आपल्या जिल्हा परिषदेचे नाविन्यपूर्ण उपक्रम असून सदरचा पहिला टप्पा असून यापुढे दुसरा टप्पा दिनांक १५ नोव्हेबरनंतर राबविणार आहोत.तरी आपल्या कर संकलन वसुली मोहिमेमध्ये सातत्य कायम ठेवण्याचे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले. माझ गाव माझ तीर्थ मोहीम राबविण्यात येणार आहे.गावातून कामानिमित बाहेर गावी गेलेले, उच्च पदावर कार्यरत असणारे , वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक केलेल्या भूमिपुत्राकडून लोकवर्गणी जमा करून गावातील शाळा,अंगणवाडी,ग्रामपंचायत बळकटीकरण करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top