मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी धनंजय पाटील गुरुजी; व्हा. चेअरमनपदी सौ. सुषमा सुतार यांची फेरनिवड
मंगळवेढा तालुका शिक्षक पतसंस्थेच्या निवडीने शिक्षकांमध्ये समाधान
मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमनपदी लक्ष्मीदहिवडी गावचे सुपुत्र धनंजय सूर्यकांत पाटील गुरुजी यांची निवड करण्यात आली आहे तसेच व्हा. चेअरमनपदी शिक्षक समिती महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा संस्थेच्या संचालिका सौ.सुषमा सुतार मॅडम यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

या निवडीप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक समितीचे पदाधिकारी तसेच मंगळवेढा तालुक्यातील विविध मित्र संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.नव्या नेतृत्वामुळे संस्थेच्या कार्यास अधिक गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

