कै.नीला देसाई यांच्या निधनाने शिवसेनेच्या संघर्षशील नेतृत्वाची उणीव : डॉ.नीलम गोऱ्हे

शिवसेनेच्या shivsena पहिल्या महिला आमदार नीला देसाई mla nilam desai यांचे निधन; स्त्रीशक्तीची मोठी हानी : उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे dr nilam gorhe यांची भावपूर्ण श्रद्धांजली

कै.नीला देसाई यांच्या निधनाने शिवसेनेच्या संघर्षशील नेतृत्वाची उणीव : डॉ.नीलम गोऱ्हे

शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार कै. नीला देसाई यांच्या निधनाने स्त्रीशक्तीची मोठी हानी झाल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. त्यांच्या कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Mumbai news : मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ जानेवारी २०२६ :शिवसेनेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या तसेच विधानपरिषदेच्या सदस्य म्हणून निवडून येत शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान मिळविणाऱ्या कै. नीला देसाई यांच्या निधनाने शिवसेनेच्या जुन्या पिढीतील एक कर्तृत्ववान, संघर्षशील आणि निष्ठावंत नेत्या आपण गमावल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

कै.नीला देसाई यांचे शुक्रवार दि.१६ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पक्षासह संपूर्ण राजकीय व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या संदर्भात बोलताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, नीला ताईंसोबत माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. दूरध्वनीद्वारे आमचा नियमित संपर्क असायचा. त्या विधानभवनात आल्यावर आमच्या प्रत्यक्ष भेटी होत आणि त्यावेळी शिवसेनेच्या कार्यावर, महिला संघटनांवर सखोल चर्चा व्हायची. शिवसेना महिला आघाडीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही एकत्र सहभागी झालो होतो.

डॉ.नीलम गोऱ्हे

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कार्य करणाऱ्या कै. नीला देसाई या आक्रमक, स्पष्टवक्त्या आणि धाडसी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याचा संदर्भ आपण विधानपरिषदेत आपल्या कामकाजादरम्यान दिल्याचेही डॉ.गोऱ्हे यांनी नमूद केले.

त्यांच्या निधनाने शिवसेनेच्या संघर्षशील आणि अनुभवी नेतृत्वाची मोठी उणीव भासणार आहे. या दुःखद प्रसंगी मी देसाई कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून ईश्वरचरणी प्रार्थना करते की दिवंगत आत्म्यास सद्गती लाभो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो,अशा शब्दांत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या श्रद्धांजलीपर भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Back To Top