रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य शपथ दिन उत्साहात; ३८१ व्या वर्षानिमित्त भव्य सोहळा

हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोहळा उत्साहात साजरा

रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्य शपथ दिन उत्साहात; ३८१ व्या वर्षानिमित्त भव्य सोहळा

पुणे|ज्ञानप्रवाह न्यूज –चैत्र शुद्ध. सप्तमी, ३८१ वा हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे औचित्य साधून शिवपालखी,शासकीय शिववंदना, शिवव्याख्यान, गड-ध्वज पूजन,२००० क्रांतीकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, हिंदवी स्वराज्य शपथभूमी – रायरेश्वर पुस्तिकेचे विमोचन, शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध सप्तमी’ १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.२०२६ हे वर्ष हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिनाचे ३८१ वे वर्ष आहे. यावर्षी देखील विविध उपक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिर,रायरेश्वर पठार,रायरी, ता.भोर,जि.पुणे येथे करण्यात आले होते.

या दिनाचे औचित्य साधून श्री रायरेश्वर ग्रामस्थ संस्था रायरेश्वर, बायोस्फिअर्स संस्था पुणे,ग्रामपंचायत रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे व स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन केले होते. चैत्र शुद्ध सप्तमी तिथीनुसार ह्या वर्षी बुधवार दि.२५ मार्च २०२६ ला हिंदवी स्वराज्य शपथ भूमी श्री रायरेश्वर मंदिर आणि परिसरात स. ६ ते दु. १.३० वा.पर्यंत अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन केले होते यात शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दुग्धाभिषेक, गड आणि ध्वज पूजन, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक व अभिषेक, संस्कृती प्रतिष्ठान फलटण यांची ढोल- ताशा व ध्वज पथक वाद्य सेवा, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने संग्रहित २००० क्रांतीकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन, शुभम दिघे, वरद कोळपकर, उर्वशी वैजवाडे आरेखित श्री जननी माता मंदिर व हिंदवी स्वराज्य स्तंभ चित्रांचे विमोचन, डॉ. सचिन पुणेकर लिखित हिंदवी स्वराज्य शपथभूमी – रायरेश्वर माहिती पुस्तिकेचे विमोचन, शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा सन्मान तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे शिववंदना अश्या अनेक उपक्रमांची पर्वणी होती. सदर उपक्रमात हिंदवी स्वराज्य शपथ घेताना छत्रपती शिवरायांसोबत त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिव-शंभूप्रेमी,संत,अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार आदी मोठ्या संखेने उपस्थित होते.

स्वराज्याच्या या सोहळ्यात डॉ.नीलकंठ शिवाचार्य महाराज, डॉ.मोहन वामन,डॉ. सचिन अनिल पुणेकर,युवराज जेधे, मारुती आबा गोळे, दत्तात्रय जंगम, श्री. मौनीबाबा महाराज,रवींद्र कंक, प्रदीप मरळ,मंगेश शिळीमकर,सुनील चिकणे, राहुल पापळ, रवींद्र जंगम,सचिन देशमुख, रोहन इंगवले,अमित घरत यांच्या सन्माननीय उपस्थितीत वर नमूद उपक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सचिन पुणेकर व सूत्रसंचालन श्री. लक्ष्मण शिंदे यांनी केले.

याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी रायरेश्वर भूमीचा समग्र शाश्वत विकास, केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत व महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या स्वराज्य सर्किट (किंवा शिव स्वराज्य सर्किट) मध्ये श्री क्षेत्र रायरेश्वर प्रेरणाभूमीचा समावेश व हिंदवी स्वराज्य स्तंभ श्री क्षेत्र रायरेश्वर येथे उभारण्याबाबतची तातडीची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच स्वराज्याचा कुंभमेळा अधिक शासकीय माध्यमातून आणि व्यापक लोकसहभागातून साजरा करण्याच्या निर्धार केला.भारताच्या आणि राज्याच्या विविध मंत्री महोदयांनी या सोहळ्याला,अभियानाला दिलेल्या शुभेच्छा व पाठींब्याचे वाचन करण्यात आले.

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंद्रजीत जेधे, समीर घोडेकर, गणेश मानकर, केदार कुलकर्णी, अभिजित भसाळे, गणपत चोर, धनंजय चोर, रुपेश तिकोने, वसीम मुलानी, राजेश महांगरे, दत्तात्रय गायकवाड,शैलेंद्र पटेल,पराग शिळीमकर, संदीप जंगम, सखाराम जंगम, गणेश जंगम, मारुती जंगम, दशरथ जंगम, राजीव संत, शुभम दिघे, वरद कोळपकर, स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान मिळाले.

Leave a Reply

Back To Top