पंढरपूरात बसवेश्वर जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; वीरशैव लिंगायत समाजाचा प्रेरणादायी उपक्रम

पंढरपूरात बसवेश्वर जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान; वीरशैव लिंगायत समाजाचा प्रेरणादायी उपक्रम

महात्मा बसवेश्वर जयंतीपूर्वी स्मशान भूमीत स्वच्छता; समाजबांधवांचा एकत्रित सहभाग

Pandhapur news : पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ एप्रिल : महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपत हा उपक्रम राबविण्यात आला.


ज्या समाजात आपण जन्मलो, त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो, या विचारातून प्रेरणा घेत समाजबांधवांनी हा समाजाभिमुख उपक्रम हाती घेतला. यासाठी सर्वांनी एकत्र येत स्मशानभूमी स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आणि काही तासांतच परिसराचे रूपडे बदलून गेले.

येत्या १९ एप्रिल रोजी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी होत असून, त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या उपक्रमांचा एक भाग म्हणून हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानात श्वेता डोंबे,आरती बसवंती, निलराज डोंबे, अनंत कटप, मयुर भिंगे, विशाल आर्वे, युवराज मुचलंबे, महेश विभुते, प्रशांत मेनकुदळे, गिरिष पंतोजी-पाटील, गंगाधर स्वामी, लल्लू स्वामी, ओंकार बसवंती, सागर स्वामी, अनंत मेनकुदळे आदींसह वीरशैव लिंगायत समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top