वेणूनगरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवेदन; एफआरपी थकबाकीच्या बातम्या चुकीच्या असल्याचा आरोप

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून एफआरपीबाबत स्पष्टीकरण; शेतकऱ्यांची १०० टक्के रक्कम अदा केल्याचा दावा

वेणूनगरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे निवेदन; एफआरपी थकबाकीच्या बातम्या चुकीच्या असल्याचा आरोप

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, वेणूनगर यांनी एफआरपी थकबाकीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीवर स्पष्टीकरण देत ३० एप्रिल २०२६ अखेर शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी रक्कम अदा केल्याचा दावा केला आहे. चुकीच्या माहितीतून संभ्रम निर्माण होत असल्याचे कारखान्याने म्हटले आहे.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०५/ २०२६ – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणूनगर ता.पंढरपूर यांनी एफआरपी थकबाकी संदर्भात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांची संपूर्ण एफआरपी रक्कम अदा केल्याचा दावा केला आहे. याबाबत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. आर.गायकवाड यांनी निवेदन जारी केले आहे.

कारखान्याच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र सरकारच्या धोरणानुसार जाहीर करण्यात आलेली एफआरपी रक्कम आणि संचालक मंडळाने घोषित केलेली उर्वरित रक्कम ३० एप्रिल २०२६ अखेर सर्व संबंधित ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे.

एका वृत्तपत्रामध्ये कारखान्याकडे एफआरपीची मोठी थकबाकी असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्याने सभासद आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे कारखान्याने म्हटले आहे. संबंधित माहिती जुनी किंवा चुकीची असण्याची शक्यता व्यक्त करत कारखान्याने अशा बातम्यांमुळे संस्थेची विश्वासार्हता प्रभावित होत असल्याची खंत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. आर.गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.

कारखान्याने स्पष्ट केले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर १०० टक्के एफआरपी जमा करण्यात आली असून शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच योग्य माहिती प्रसिद्ध करून शेतकऱ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Back To Top