दौंडमध्ये ९ वर्षांच्या मुलीची हत्या; डॉ. नीलम गोऱ्हे यांची कठोर कारवाईची मागणी
मन हेलावणारी घटना – चिमुरडी हत्या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे आक्रमक
दौंडमधील चिमुरडी हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरला; उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची कठोर कारवाईची मागणी
९ वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी
पुणे |ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ६ मे २०२६ – दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे अवघ्या ९ वर्षांच्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे Dr.Neelam Gorhe यांनी गंभीर दखल घेत पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांना लेखी निवेदन सादर केले आहे.
डॉ.नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी तांत्रिक व भौतिक पुरावे गोळा करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती केली आहे. तसेच पीडित कुटुंबातील साक्षीदार असलेल्या लहान मुलाला विशेष संरक्षण देण्या बरोबरच त्याच्या मानसिक समुपदेशनाची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली.

या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,ही अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि हृदयद्रावक घटना आहे. किरकोळ कारणावरून एका चिमुरडीचा जीव घेणे ही अत्यंत गंभीर बाब असून समाजात कठोर संदेश जाण्यासाठी आरोपीला कडक शिक्षा होणे आवश्यक आहे.
यासोबतच त्यांनी सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे २७ मार्च रोजी घडलेल्या दोन मुलींना उलटे टांगून मारहाण केल्याच्या घटनेचाही उल्लेख केला.त्या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला होता. अशा घटनांमागे कुटुंबातील नकारात्मक मानसिकता आणि बालकांवरील अत्याचाराची वाढती प्रवृत्ती चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.राज्यात वाढत्या बालकांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे पालक, प्रशासन आणि समाजाने एकत्र येऊन संवेदनशीलतेने काम करण्याची गरज निर्माण झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे ९ वर्षीय मुलीच्या निर्घृण हत्येप्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेत फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची तसेच पीडित कुटुंबाला संरक्षण व मानसिक समुपदेशनाचीही मागणी केली.

