विठ्ठल-रुक्मिणी तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी 16 मेपासून सुरू; 17 ते 24 मे कालावधीतील पूजांसाठी सुविधा उपलब्ध

विठ्ठल-रुक्मिणी तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी 16 मेपासून सुरू; 17 ते 24 मे कालावधीतील पूजांसाठी सुविधा उपलब्ध

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून 17 ते 24 मे 2026 या कालावधीतील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाइन नोंदणी 16 मे रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे. भाविकांना अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करता येणार.

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज : Shri Vitthal Rukmini Mandir श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तुळशी अर्चन पूजेच्या ऑनलाइन नोंदणीला दि. 16 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजल्या पासून सुरुवात होत असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

दि. 17 ते 24 मे 2026 या कालावधीतील तुळशी अर्चन पूजेसाठी ही नोंदणी करण्यात येणार असून, गर्दीचे तसेच सण-उत्सवाचे दिवस वगळून भाविकांना पूजा सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पूजेसाठी रुपये 2100 इतके देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे.

भाविकांना मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
Vitthal Rukmini Mandir Official Website

ऑनलाइन नोंदणी करताना कोणतीही अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून आवश्यक मार्गदर्शन व नोंदणीसाठी मदत करण्यात येणार असल्याचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी सांगितले.

तसेच अधिक माहितीसाठी भाविकांनी मंदिर समितीच्या 02186-299299 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Back To Top