मंगळवेढा येथे सेवेचा जागर; प्रशासकीय सेवेची गंगा १५०५ नागरिकांच्या दारी

मंगळवेढा येथे सेवेचा जागर; प्रशासकीय सेवेची गंगा १५०५ नागरिकांच्या दारी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामध्ये लाभार्थ्यांना एकाच दिवशी 1505 जणांना देण्यात आला लाभ

मंगळवेढा | ज्ञानप्रवाह न्यूज: तहसील कार्यालय मंगळवेढाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान शिबिराला मंगळवेढा येथे सुद्धा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आजच्या तालुक्यातील सहाव्या शिबिराचे उदघाटन आमदार समाधान आवताडे, नगराध्यक्षा सौ.सुनंदा बबनराव आवताडे, उपनगराध्यक्ष येताळा भगत सर , पंचायत समिती सभापती दीपाली ताड, उपसभापती अर्जुन मल्लाळे, तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य , इतर पंचायत समिती सदस्य व मंगळवेढा नगर परिषद चे सर्व नगरसेवक यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मदन जाधव यांनी केले.आभार महसूल नायब तहसीलदार श्रीमती शीतल कन्हेरे यांनी मांडले.

शिबिराला नगर परिषद , पंचायत समिती, वनविभाग, आरोग्य विभाग, भूमी अभिलेख विभाग, पशू संवर्धन विभाग व महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंगळवेढा नगर परिषदेच्या टाऊन हॉल मध्ये हे शिबीर घेण्यात आले. या शिबिरामध्ये महसूल विभाग व इतर विभागाचे असे एकूण 25 स्टॉल उभारण्यात आले होते.

तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी एकाच छताखाली महसूल विषयक सेवा देताना दिसून आले तर तहसील कार्यालयातील सर्व शाखांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा जनतेला तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्या.

मंगळवेढा तालुक्यात एकूण 6 शिबीर राबविण्यात आले असून आज मंगळवेढा मंडळाच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आजच्या शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत महसूल विषयक व इतर विभागांच्या सेवांचा लाभ घेतला.
आजच्या शिबिरामध्ये महसूल विभागाच्या वतीने एकूण 1473 लाभार्थ्यांना लाभ दिला त्यामध्ये प्रामुख्याने, अभियानांतर्गत आजरोजी निकाली काढण्यात आलेल्या फेरफारांची संख्या -302, अभियानांतर्गत 7/12 मधील दुरुस्ती संदर्भात स्वीकारण्यात आलेल्या अर्जांची संख्या -10, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या डिजिटल 7/12 उपलब्ध करून दिलेली संख्या – 410, अभियानांतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण 8 अ उताऱ्यांची संख्या -347, अभियानांतर्गत वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची संख्या -189.

त्याचबरोबर संजय गांधी योजनेच्यावतीने 13 दाखले वाटप,पुरवठा विभागाच्या वतीने 06 ऑनलाईन व नवीन शिधा पत्रिका वाटप , अभिलेख शाखेच्या वतीने ग्राम महसूल अधिकारी यांना 27 प्रिंटर वाटप ,6 लाभार्थ्यांना जन्म मृत्यू प्रमाणपत्र वाटप असे महसूल विभागाच्यावतीने आज एकूण 1473 नागरिकांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला.

त्याचबरोबर पंचायत समिती -32, आरोग्य विभाग -20 असे आजच्या शिबिरात एकूण 1505 लाभार्थ्यांना एकाच दिवशी लाभ देण्यात आला.

अशा पद्धतीने मंगळवेढा तालुक्यामध्ये एकूण सहा समाधान शिबिरे यशस्वीरित्या पार पाडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियानाचा समारोप करण्यात आला.

आजचे शिबिर यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार शीतल कन्हेरे , निवासी नायब तहसीलदार शिरीष शहापुरे,निवडणूक नायब तहसीलदार जयश्री स्वामी,मंडळ अधिकारी मंगळवेढा श्री.इंगोले , मंगळवेढा ग्राम महसूल अधिकारी दिनेश सोनुणे , सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक,स्वस्त धान्य दुकानदार, पोलीस पाटील यांनी विशेष प्रयत्न केले.

या शिबिराला तालुक्यातील इतर सर्व मंडळ अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top