पंढरपूर शहरातील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित; पात्र नागरिकांना अर्जाचे आवाहन

पंढरपूर शहरातील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित; पात्र नागरिकांना अर्जाचे आवाहन

सरकारी जागेवरील घरांना मिळणार कायदेशीर मान्यता; पंढरपूरात अर्ज प्रक्रिया सुरू

पंढरपूर| ज्ञानप्रवाह न्यूज –शहरातील 1 जानेवारी 2011 पूर्वीची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावेत,असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे.

पंढरपूर शहरातील 2011 पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमित

महसूल व वन विभागाच्या 25 मार्च 2026 रोजीच्या शासन निर्णयामुळे अनेक वर्षांपासून सरकारी जागेवर वास्तव्यास असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे संबंधित घरांना कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासन निर्णयानुसार 500 चौरस फुटांपर्यंतचे अतिक्रमण विनामूल्य कायम करण्यात येणार असून 500 ते 1500 चौरस फुटांपर्यंतच्या अतिरिक्त क्षेत्रासाठी बाजारमूल्याच्या 10 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.

पंढरपूर शहरातील नागरिकांनी अर्जासाठी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासोबत मतदार यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कर पावती, रहिवासाचा पुरावा आणि महाराष्ट्रात एकच घर असल्याचे शपथपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे. अर्जाचा नमुना नगरपरिषदेच्या नगररचना विभागात उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Leave a Reply

Back To Top