शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर आमदार सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सकारात्मक प्रतिसाद

ग्रंथालय कर्मचारी,रिक्त पदे आणि परीक्षा व्यवस्थापनाच्या प्रश्नांवर चर्चा; शिक्षण क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता

Mumbai news:मुंबई |ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ जून : शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथालय क्षेत्रातील रिक्त पदे, कला शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक देखरेख प्रक्रियेतील अडचणी तसेच परीक्षा व्यवस्थापनाशी संबंधित विविध मुद्दे त्यांनी मंत्री महोदयांसमोर मांडले.

बैठकीत सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, अनुदानासंदर्भातील प्रश्न, ग्रंथालय क्षेत्रातील रिक्त पदे, वेतनवाढ आणि सेवा सुविधांबाबत विशेष पाठपुरावा करण्यात आला. याशिवाय कला शिक्षण मंडळाच्या शैक्षणिक देखरेख प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी निदर्शनास आणून देत त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.

तसेच सल्लामसलत प्रक्रिया आणि परीक्षा व्यवस्थापना बाबत पुनर्विचार करण्याची आवश्यकता आमदार तांबे यांनी मांडली. या सर्व विषयांवर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही आणि उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्याच्या प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न,सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या मागण्या, रिक्त पदे, अनुदान, वेतनवाढ आणि परीक्षा व्यवस्थापनासंदर्भातील मुद्द्यांवर आमदार सत्यजीत तांबे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन आवश्यक कार्यवाहीचे निर्देश देण्यात आल्याने शिक्षण क्षेत्राला दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Back To Top