धर्मरक्षण ही प्रत्येक हिंदूची जबाबदारी,राष्ट्र-धर्मासाठी सज्ज होण्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन

अक्कलकोटच्या हिंदू धर्म-संस्कार शिबिराला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सदिच्छा भेट

धर्मरक्षण ही प्रत्येक हिंदूची जबाबदारी,राष्ट्र-धर्मासाठी सज्ज होण्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन

सोलापूर| ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०६/०६/२०२६ – हिंदु जनजागृती समितीच्यावतीने अक्कलकोट येथील येथे ४ ते ६ जून २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय निवासी हिंदु धर्म-संस्कार शिबिराला अक्कलकोट मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी शिबिरातील युवक-युवतींशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांविषयी आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, धर्मरक्षण ही प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे.राष्ट्र आणि धर्मासाठी आवश्यक असलेले ज्ञान, संस्कार आणि मूल्ये युवकांनी आत्मसात केली पाहिजेत.आजच्या काळात अशा शिबिरांची समाजाला मोठी आवश्यकता असून युवकांनी राष्ट्रहित आणि धर्महित यांसाठी सज्ज होणे गरजेचे आहे.

सोलापूर, लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांतील १५० हून अधिक युवक-युवती या शिबिरात सहभागी झाले आहेत. युवकांच्या मनात धर्माभिमान, राष्ट्रनिष्ठा, चारित्र्यसंपन्नता आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरास सनातन संस्थेच्या संत दीपाली मतकर यांची उपस्थिती लाभली.

शिबिरातील व्यवस्था, स्वयंसेवकांचा सेवाभाव आणि युवकांचा उत्साह पाहून आमदार कल्याणशेट्टी यांनी अशी शिबिरे सातत्याने आयोजित केली पाहिजेत. अक्कलकोट सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रात युवकांना धर्म, संस्कार आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारे उपक्रम नियमितपणे होत राहावेत. आम्हालाही अशा सेवाकार्यात सहभागी होण्याची संधी देत राहा, असे सांगितले.

आमदार कल्याणशेट्टी यांना विविध विषयांवर निवेदने देण्यात आली.

धर्म, संस्कार, स्वसंरक्षण आणि राष्ट्रसेवा यांचा समन्वय साधत युवकांना आदर्श जीवनाची प्रेरणा देणारे हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

Leave a Reply

Back To Top