पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; ९.३० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त,घरफोडी व चोरीचे ३ गुन्हे उघडकीस

पंढरपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई; ९.३० लाखांचे सोन्याचे दागिने जप्त, घरफोडी व चोरीचे ३ गुन्हे उघडकीस

CCTV आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पंढरपूर पोलिसांना मोठे यश; ३ चोरीचे गुन्हे उघड, १००% मुद्देमाल हस्तगत

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपुर शहर पोलीस ठाणे गु.र.नं.311/ 2026 भारतीय न्याय संहिता-2023 चे क. 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी शोभा आबासाहेब निलंगे, रा.शिक्षक कॉलनी माळशिरस जिल्हा सोलापूर या दि.17/04/2026 रोजी दुपारी 02/30 वा चे सुमारास माळशिरस ते पंढरपूर बसने प्रवास करत असताना 28 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र 3,45000/- रुपये किमतीचे चालू भावाप्रमाणे पंढरपूर बस स्थानक येथून अज्ञात चोरट्याने चोरी केले होते.

त्यानंतर या गुन्ह्याचा तपास चालू असता सदर गुन्ह्याचे तपासकामी पथके तयार करून पंढरपूर शहरातील 36 ते 40 सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करून व मोबाईल टॉवरचे तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यात दोन आरोपी 1) प्रिया रवींद्र काळे वय 30 वर्ष, रा राजापूर ता. मंगळवेढा जि. सोलापूर, 2) संदीप युवराज मोरे वय 26 वर्ष,रा. अंबाबाई मंदिर गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन, विजापूर रोड सोलापूर यांचेकडून या गुन्ह्यात चोरी केलेला 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

गु.र. क्र 284/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी मुकुंद संजय चव्हाण रा.सुस्ते ता. पंढरपूर जि.सोलापूर यांचे दि. 03/05/2026 रोजी 12/30 वा वाजताचे सुमारास त्यांचा मावस भाऊ वैभव जाधव यांचे श्रीराम मंगल कार्यालय इसबावी पंढरपूर येथे लग्न समारंभात गर्दीचा फायदा घेऊन नवरी मुलीचे फिर्यादीचे आईकडे ठेवलेले बॅग मधील 20.789 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र,5.920 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण,9.800 ग्रॅम वजनाचे सोन्याचे चोकर्स असे एकूण 36.499 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत 5,40,000/- रुपये चालू भावाप्रमाणे अज्ञात चोरट्याने चोरी केले होते. या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान पंढरपूर शहर व इतर गावातील जवळपास 65 ते 70 सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून तसेच सीडीआर एसडीआर व मोबाईल टॉवर चे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्ह्यात आरोपी संदीप युवराज मोरे वय 26 वर्ष, रा.अंबाबाई मंदिर गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन विजापूर रोड सोलापूर यांच्याकडून या गुन्ह्यात चोरी केलेले 100% सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

गु.र.क्र 432/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी स्वाती भारत डुकरे रा,आंबी ता. राहुरी जि.अहिल्यानगर यांचे दि. 27/06/2026 रोजी 10/30 वा चे सुमारास पंढरपूर बस स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 03 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र किंमत 45000/- रुपये चोरी केले होते.

या तपासादरम्यान 24 तासाच्या आत पंढरपूर शहरातील 40 ते 45 सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून आरोपी चांदणी हिरु भोसले वय 20 वर्ष रा.माळवाडी वडगाव गुप्ता, ता.जि.अहिल्यानगर हीच्याकडून 100%  मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

या तीन घटनांतील एकूण 67.499 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 9,30,000/- रुपये किमतीचे असा 100% मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगीरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग प्रशांत डगळे,पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर,DB पथक पोलीस उपनिरीक्षक नितीन जगताप, श्रेपोसइ राजेश गोसावी, सपोफौ शरद कदम,पोह सिरमा गोडसे,पोह 353/ उबाळे, पोह सचिन हेंबाडे, पोह श्री.पाटील,पोना साहिल तांबोळी,पोना कृष्णा पकाले, पोशि शहाजी मंडले,पोशि श्री.नवले, पोकॉ बजरंग बिचुकले,पोकॉ हर्षद ठाकर, पोकॉ लक्ष्मण वाघमोडे तसेच सायबर शाखा सोलापुर ग्रामीण चे पोशि रतन जाधव, प्रकाश वाघमारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top