महागाईने कंबरडे मोडले आता जीव घेता का? गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ
आजपासून (१९ मे) दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किमत १ हजार ३, मुंबईत १ हजार २ रुपये ५० पैसे, कोलकातामध्ये १ हजार २९ रुपये, तर चेन्नईत १ हजार १८ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. या महिन्यात घरगुती सिलेंडरची किमत वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. याआदी ७ मे रोजी सिलेंडरची किमत ५० रुपयांनी वाढवण्यात आली होती. घरगुती सिलेंडर सोबत १९ किलोचा व्यवसाइक सिलेंडर देखील महाग झाला आहे. त्याच्या किमतीत ८ रुपयांनी वाढ करण्यात आली असून यामुळे दिल्लीत त्याची किमत २ हजार ३५४, मुंबईत २ हजार ३०६, कोलकातामध्ये २ हजार ४५४ आणि चेन्नईत २ हजार ५०७ रुपये इतकी झाली आहे.
वाचा- अश्लील व्हिडिओ प्रकरण : राज कुंद्राविरोधात कारवाईचा फास; ईडीने दाखल केला गुन्हा
आजच्या किमत वाढीमुळे संपूर्ण देशात १४.२ किलोचा घरगुती सिलेंडरची किमत १ हजारच्या पुढे गेली आहे. एक वर्षापूर्वी दिल्लीत घरगुती सिलेंडरची किमत ८०९ होती. २२ मार्च रोजी त्याच्या किमती ५० रुपयांनी वाढल्या होत्या. त्यानंतर एप्रिल महिन्यात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मे महिन्यात सात तारखेला ५० रुपयांची वाढ झाल्यानंतर सिलेंडरच्या किमती १ हजारच्या जवळ पोहोचल्या होत्या. आजच्या वाढीसह देशभरात किमती १ हजारच्या पुढे गेल्या आहेत.