JK: कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतोय, पंतप्रधान मोदींची जवानांना भावनिक साद


हायलाइट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाही जवानांसोबत साजरी केली दिवाळी
  • नौशेरात तैनात जवानांची घेतली भेट
  • ‘मुख्यमंत्री-पंतप्रधान म्हणून प्रत्येक दिवाळी जवानांसोबतच साजरी केली’

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवारी) जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये दाखल झाले आहेत. इथं ते जवानांसोबत आपली दिवाळी साजरी करणार आहेत.

नौशेरामध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तसंच थेट जवानांशी संवाद साधून पंतप्रधान त्यांची विचारपूस करत आहेत.

यावेळी, सेना अधिकाऱ्यांची जवानांची भेट घेताना पंतप्रधानही उत्साही दिसत होते. तसंच त्यांच्या उपस्थितीनं जवानांच्या चेहऱ्यावरीह आनंद पसरला.

हेच आपलं कुटुंब असून आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असल्याची भावना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. अगोदर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता पंतप्रधान म्हणून आपली प्रत्येक दिवाळी आपण याच कुटुंबासोबत साजरी केल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं.

जवान सीमेवर ठाण मांडून सज्ज आहेत त्यामुळेच संपूर्ण देश निश्चिंत झोपू शकतो. आपले जवान हे देशाचं सुरक्षा कवच आहेत. तुमच्यामुळे देशात शांती आणि सुरक्षा कायम आहे. वीरतेचं हेच जिवंत असल्याचंही सांगत पंतप्रधानांनी जवानांविषयी आपुलकी व्यक्त केली.

Diwali Celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत देशातील नेत्यांकडून जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा!
petrol and diesel excise duty : भाजपशासित राज्यांचा मोठा निर्णय; केंद्रानंतर ६ राज्यांची इंधनावरील व्हॅटमध्ये कपात

यावेळी, पंतप्रधानांनी अगोदरच्या काँग्रेस सरकारवरही निशाणा साधला. देशाच्या जवानांसाठी जेव्हाही हत्यारं खरेदी करण्याची वेळ येई तेव्हा तेव्हा आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागेल. मात्र, आता देशातच अत्याधुनिक हत्यारं तयार होत आहेत, असं म्हणत आपल्या सरकारचीही पाठ मोदींनी थोपटली.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत आठव्यांदा दिवाळी साजरी करत आहेत. मे २०१४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती.

२३ ऑक्टोबर २०१४ : पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधानांनी आपली पहिली दिवाळी सियाचिनमध्ये जवानांसोबत साजरी केली होती.

११ नोव्हेंबर २०१५ : पंतप्रधान मोदी पंजाबमध्ये जवानांसबोत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहचले होते. १९६५ च्या युद्धाच्या युद्ध स्मारकालाही त्यांनी यावेळी भेट दिली.

३० ऑक्टोबर २०१६ : पंतप्रधान मोदी २०१६ मध्ये हिमाचलच्या किन्नौरमध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी दाखल झाले होते. इथे त्यांनी भारत – चीन सीमेजवळ जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

१८ ऑक्टोबर २०१७ : २०१७ साली पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरच्या गुरेजमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली

७ नोव्हेंबर २०१८ : यावेळी, पंतप्रधान मोदींनी भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या जवानांसोबत उत्तराखंडच्या हर्षिलमध्ये दिवाळी साजरी केली

२७ ऑक्टोबर २०१९ : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९ साली राजौरीच्या नियंत्रण रेषेवर तैनात जवानांसोबत दिवाळी साजरी केली

१४ नोव्हेंबर २०२० : पंतप्रधान मोदींनी जैसलमेरमध्ये लोंगोवाला पोस्टवर जवानांसोबत दिवाळी साजरी केली.

४ नोव्हेंबर २०२१ : आज पंतप्रधान मोदी जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरामध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत

PHOTO : दिवाळी… सण दिव्यांचा, फराळाचा आणि आनंदाचा!

PHOTO : दहशतवादानं थरारणाऱ्या काश्मीरमध्ये फुलली केशराची फुलं!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: