अदानींचे आता पर्यटन क्षेत्रावर लक्ष; ‘क्लियरट्रिप’मध्ये अदानी समूहाने केली गुंतवणूक


हायलाइट्स:

  • भारतातील प्रवास व पर्यटन उद्योग पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत आहे
  • फ्लिपकार्ट समूहाने संपादन केल्यापासून क्लियरट्रिपच्या फ्लाइट बुकिंग्जमध्ये दहापटींनी वाढ झाली.
  • अदानी समूहाने क्लियरट्रिप प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

अहमदाबाद : देशात वेगाने वाढणारा वैविध्यपूर्ण उद्योगसमूह असलेल्या अदानी समूहाने क्लियरट्रिप प्रायव्हेट लिमिटेड या ऑनलाइन प्रवास सुविधा कंपनीत गुंतवणूक करण्याची घोषणा केली. या माध्यमातून (ऑनलाइन ट्रॅव्हल अॅग्रिगेटर- ओटीए) तसेच फ्लिपकार्ट समूहाच्या काही व्यावसायिक विभागात गुंतवणूक करणार आहे असल्याचे अदानी समूहाने म्हटलं आहे.

खुशखबर! सणासुदीत सोन्याचा भाव गडगडला, जाणून घ्या आज कितीने स्वस्त झालं सोनं
भारतातील प्रवास व पर्यटन उद्योग पुन्हा उभारी घेण्याच्या तयारीत असताना या गुंतवणुकीच्या माध्यमातून अदानी समूह आणि फ्लिपकार्ट समूह यांच्यात निर्माण होणाऱ्या समन्वयातून ग्राहकाला अधिक उत्तम दर्जाच्या प्रवासानुभवाचा लाभ होईल. फ्लिपकार्ट समूहाने संपादन केल्यापासून क्लियरट्रिपच्या फ्लाइट बुकिंग्जमध्ये दहापटींनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर अदानी एअरपोर्ट्सवर निदर्शनाला आलेल्या ट्रेण्डनुसार विमानतळावर प्रवाशांची संख्या वाढली असून ती आता कोविडपूर्व काळातील संख्येशी बरोबरी साधू लागली आहे. या भागीदारीतून क्लियरट्रिप डिजिटल सीमा ओलांडण्यास सक्षम बनेल आणि संपूर्ण-परिपूर्ण ऑनलाइन प्रवाससेवा पुरवेल.

जाणून घ्या पेट्रोल-डिझेल स्वस्त करणारे ‘उत्पादन शुल्क’ म्हणजे नेमकं काय?
फ्लिपकार्टबरोबर अदानी समूहाचे मजबुतीने विकसित होणारे नाते असून त्यात डेटा सेंटर, फुलफिलमेंट सेंटर आणि आता हवाई प्रवास अशा विविध पैलूंचा समावेश आहे, असे अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी म्हटलं आहे. देशांतर्गत विकसित झालेल्या कंपन्यांबरोबर अशा प्रकारच्या धोरणात्मक भागीदाऱ्या करण्यातूनच अखेर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल आणि आत्मनिर्भर भारत तयार होईल. आम्ही ज्या सुपरअॅपच्या प्रवासावर निघालो आहोत, त्याचा क्लियरट्रिप प्लॅटफॉर्म हा अत्यावश्यक भाग बनेल, असे अदानी यांनी सांगितले.

स्वस्ताईची पहाट! शुल्क कपातीनंतर जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
क्लियरट्रिपकडील गरजेनुसार विस्तारक्षम असलेले तंत्रज्ञान, वापरकर्ता-स्नेही इंटरफेस आणि उद्योगात सर्वप्रथम असलेले पुढाकार यांच्या बळावर हा भारतातील सर्वात लोकप्रिय ट्रॅव्हल ब्रँड्सपैकी एक बनला आहे. याचबरोबर, अनुभवी वरिष्ठांची टीम व फ्लिपकार्टकडे असलेला अतिशय सखोल ग्राहककेंद्री अनुभव यांच्या बळावर कंपनीने गेल्या काही महिन्यांत ओटीए क्षेत्रातील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. प्रवाससंबंधित उत्पादने, लॉयल्टी प्रोग्राम आणि इतर मूल्यवर्धित सेवांसारख्या क्षेत्रांत अदानी ग्रूपबरोबर सहयोगाच्या माध्यमातून ग्राहकांना प्रवासाचा अधिक सुसूत्र अनुभव देण्याचा आणि कंपनीच्या विकासाला चालना देण्याचा क्लियरट्रिपचा उद्देश आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: