भारताला विश्वविजेता बनविणारा कर्णधार खेळणार ऑस्ट्रेलियाच्या संघातून; फिंचसोबत उतरणार मैदानात


नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाची टी-२० लीग बिग बॅश लीगमध्ये आता भारतीय खेळाडूही दिसणार आहे. कारण या लीगमध्ये पहिल्यांदाच भारतीय पुरुष क्रिकेटपटूला करारबद्ध करण्यात आले आहे. उन्मुक्त चंद असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. उन्मुक्त चंद काही महिन्यांपूर्वीच भारत सोडून अमेरिकेत गेला होता. आता तो बिग बॅश लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. मेलबर्न रेनेगेड्सने उन्मुक्त चंदला आपल्या गोटात स्थान दिले आहे. या लीगमध्ये खेळणारा तो भारतातील पहिला पुरुष क्रिकेटपटू असेल. बिग बॅश लीगमध्ये भारताच्या अनेक महिला खेळाडू खेळत आहेत. या लीगमध्ये भारतीय पुरुष क्रिकेटपटू खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल.

वाचा- धक्कादायक वक्तव्य; रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाल्यास होणार मोठे नुकसान

भारताच्या पुरुष खेळाडूंना इतर कोणत्याही परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी नाही. त्यामुळे उन्मुक्त चंदने भारतीय क्रिकेटला अलविदा करून अमेरिका गाठली होती. त्यामुळे बीबीएलमध्ये खेळण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Cricket.com.au ने उन्मुक्त चंदच्या हवाल्याने म्हटले आहे की, “हा निर्णय सोपा नव्हता. मी माझ्या देशासाठी पुन्हा खेळू शकणार नाही हे सत्य स्वीकारणे खूप कठीण होते, पण मला अमेरिकेसोबत खेळण्याचा आनंद मिळाला आणि तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मी आता प्रत्येक लीगमध्ये खेळू शकतो. ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे.”

वाचा- Rohit Sharma Six: हिटमॅन रोहितचा तडाखा; विराट कोहलीला जागेवरून उठवले, Video

बीबीएलमध्ये खेळायचे होते
उन्मुक्तने सांगितले की, “मला बिग बॅश लीग बघायला आवडते. जगभरातील खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत. हे उत्तम व्यासपीठ आहेत. मला इथे खेळायचे होते. आगामी काळात मी ज्या संघासाठी खेळतो, त्या संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल. मी मेलबर्न संघाकडून खेळण्यास उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियात खेळण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो. मी यापूर्वी कधीही मेलबर्नमध्ये राहिलो नाही. मला माहीत आहे की, इथे बरेच भारतीय आहेत. त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी चांगली आहे. आशा आहे की, प्रेक्षक सामना पाहायला येतील.”

अंडर-१९ विश्वचषकाचे जेतेपद
उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारताने २०१२ मध्ये १९ वर्षांखालील (अंडर-१९) विश्वचषक जिंकला होता. त्याने अंतिम सामन्यात शतक झळकावले होते. तेव्हा त्याला पुढचा विराट कोहली म्हटले जात असे, पण तो अपेक्षेला खरा उतरला नाही. परिणामी, तो कधीही राष्ट्रीय संघाकडून खेळला नाही. त्याने आयपीएलमध्ये दिल्ली, मुंबई आणि राजस्थानच्या फ्रँचायझींचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे त्याची कारकीर्द हळूहळू कोलमडली. दुसरीकडे तो दिल्ली या त्याच्या घरच्या संघाला सोडून उत्तराखंड संघासाठी खेळला, आणि पुन्हा दिल्लीला परतला, दिल्लीत परतल्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही आणि त्यामुळेच त्याने भारतीय क्रिकेटला अलविदा केला. आता तो बीबीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर अनेक भारतीय क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळताना दिसतील, अशी अपेक्षा केली जाऊ शकते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: