भारताकडून मिळालेल्या पराभवाची भरपाई न्यूझीलंडविरुद्ध करणार; राशिद खानने केलं मोठं वक्तव्य


दुबई : मोठ्या संघांना टक्कर देणाऱ्या काही महत्वाच्या संघांमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट संघाची गणना केली जाते. कोणत्याही वेळी, कोणत्याही संघाला पराभवाचा धक्का देण्याची ताकद या संघामध्ये आहे, पण बुधवारी (३ नोव्हेंबर) या संघाला भारताविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. भारताने अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवला. असे असले तरी अफगाणिस्तानचा संघ या पराभवाने फारसा हताश झाला नसून आता त्यांचे लक्ष्य न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना जिंकण्यावर आहे. भारताकडून झालेल्या पराभवानंतर अफगाणिस्तानचा अनुभवी लेग-स्पिनर राशिद खान म्हणाला की, न्यूझीलंडविरुद्धचा टी-२० विश्वचषकाचा पुढील सामना आमच्या संघासाठी उपांत्यपूर्व फेरीसारखा असेल.

वाचा- Rohit Sharma Six: हिटमॅन रोहितचा तडाखा; विराट कोहलीला जागेवरून उठवले, Video

सुपर-१२ टप्प्यात चार सामने खेळल्यानंतर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांचे नेट रनरेट +१.४८१ आहे. पाकिस्तानने गट २ मधून उपांत्य फेरी गाठली आहे. भारताच्या पराभवाचा संघाच्या गतीवर परिणाम होईल का, असे विचारले असता राशिदने नकारार्थी उत्तर दिले. यामुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही, असे राशिद म्हणाला. भारत हा सर्वोत्तम संघांपैकी एक आहे हे आम्हाला माहीत आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना आमच्यासाठी उपांत्यपूर्व फेरीचा ठरू शकतो. आम्ही त्याच पद्धतीने तयारी करू आणि त्याच मानसिकतेने जाऊ. आम्ही जिंकलो तर चांगल्या धावगतीच्या आधारे आम्ही उपांत्य फेरी गाठू शकतो. खेळाचा आनंद घेतला तरच तुम्ही चांगली कामगिरी करू शकता. आम्ही आमच्या खेळाचा पुरेपूर आनंद घेऊ.”

वाचा-भारताला विश्वविजेता बनविणारा कर्णधार खेळणार ऑस्ट्रेलियाच्या संघातून; फिंचसोबत उतरणार मैदानात

भारतासाठी महत्त्वाचा सामना
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा आहे. अफगाणिस्तान जिंकल्यास, भारतीय संघाने उर्वरित दोन सामने जिंकल्यास उपांत्य फेरी गाठण्याची भारताची शक्यता वाढेल. भारताविरुद्धच्या सामन्यात नेट रनरेटचा विचार त्याच्या मनात होता का, असे विचारले असता राशिद म्हणाला, ”नक्कीच. आम्ही काही विकेट गमावल्यानंतर आमच्या मनात होते आणि म्हणूनच आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचे लक्ष्य ठेवले. आमचे लक्ष रनरेटवर होते, जो निर्णायक घटक ठरू शकतो.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: