coronavirus in mumbai: दीपावलीदिनी मुंबईकरांना दिलासा; करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली, मृत्यू ६


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत मुंबईत २६२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण २६९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज मुंबईत एकूण ६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात काल दिवाळीच्या दिवशी ३ नोव्हेंबरच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत घट असून मुत्यूंची संख्या देखील तुलनेने कमी आहे. गेल्या २४ तासात २६२ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३३० इतकी होती. तर, दिवसभरात २६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. काल ही संख्या ३७८ इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या ५ इतकी होती. (mumbai registered 635 new cases in a day with 582 patients recovered and 10 deaths today)

भटक्या जमातींना स्वतंत्र आरक्षण देण्याबाबत रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख ३४ हजार ८५९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १६ हजार २६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका खाली आला आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १७८० दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

मुंबईत आज एकूण ३५ हजार ०१८ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २३ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘दिवाळीनंतर बॉम्ब’, या वक्तव्यावरून रोहित पवारांचा फडणवीस यांना जोरदार टोला

काल संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – २६२
२४ तासात बरे झालेले रुग्ण – २६९
बरे झालेले एकूण रुग्ण – ७३४८५९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ३३७०
रुग्ण दुपटीचा कालावधी- १७८० दिवस
कोविड वाढीचा दर (२८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर)- ०.०४ %

क्लिक करा आणि वाचा- एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जातील हे हास्यास्पद; चंद्रकांत पाटील यांचा टोलाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: