पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त; २२ राज्य व केंद्रशासित प्रदेशांची दर कपात, महाराष्ट्राकडे लक्ष


हायलाइट्स:

  • देशातील २२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात केली.
  • भाजपशासित प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त झाले आहे.
  • महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ आदी राज्य सरकारे व्हॅट कमी करणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील २२ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) घसघशीत कपात केली आहे. त्यामुळे भाजपशासित प्रदेशात पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ आदी राज्य सरकारे व्हॅट कमी करणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

क्रिप्टो करन्सी झाले स्वस्त ; जाणून घ्या आज कोणकोणत्या चलनांमध्ये झाली घसरण
केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्क कपातीनंतर आतापर्यंत २२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित कर कमी केला आहे. ज्यात कर्नाटक, पुद्दुचेरी, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव , चंदीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि लडाख येथील सरकारने इंधनावरील व्हॅट कमी केला.

फास्टफूड क्षेत्रात गुंतवणूक संधी; सफायर फूड्स इंडिया लिमिटेडचा २०७३ कोटींचा IPO
उत्पादन शुल्क कपातीनंतर प्रत्यक्षात बाजारात पेट्रोल सरासरी ५.७० रुपये ते ६.३५ रुपयांच्या दरम्यान स्वस्त झाले. डिझेलमध्ये ११.१६ रुपये ते १२.८८ रुपयांची कपात झाली होती. त्यानंतर राज्यांनी मूल्यवर्धित करात कपात केली.

मुकेश अंबानींनाही ‘सेकंड होम’ची भुरळ! ‘या’ देशात ३०० एकर प्राॅपर्टी केली खरेदी, नव्या घरी दिवाळीचा जल्लोष
कर्नाटकने पेट्रोलवर ८.६२ रुपये आणि डिझेलवर ९.४० रुपये व्हॅट कमी केला. मध्य प्रदेशने पेट्रोलवर ६.८९ रुपये आणि डिझेलवर ६.९६ रुपये व्हॅट दर कमी केला. उत्तर प्रदेशने पेट्रोल ६.९६ रुपये आणि डिझेल २.०४ रुपये व्हॅट कमी केला. उत्तराखंड सरकारने पेट्रोलवर १.९७ रुपये व्हॅट कमी केला तर लडाखमध्ये डिझेलवरील व्हॅट ८.७० रुपये कमी करण्यात आला आहे. देशभरात भाजपाशासित राज्य सरकारांनी केलेल्या व्हॅट कपातीनंतर पेट्रोल आणखी जवळपास ८.७० रुपये आणि डिझेल ९.५२ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

सकारात्मक सुरवात; लक्ष्मीपूजनानंतर सोने-चांदीला तेजीची झळाळी, जाणून घ्या आजचा भाव
दरम्यान, एप्रिल ते सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कातून १.७१ लाख कोटींचे उत्पन्न मिळवले. गेल्या वर्षी याच कालावधीत सरकारला १.२८ लाख कोटींचे उत्पन्न मिळाले होते. ५ मे २०२० नंतर झालेल्या शुल्क वाढीने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क विक्रमी ३८.७८ रुपयांवर गेले होते. याच काळात डिझेलवरील उत्पादन शुल्काचा आकडा २९.०३ रुपयांपर्यंत वाढला होता.

‘या’ राज्यांची व्हॅट कपातीवर वेट अँड वॉचची भूमिका
बिगर भाजपशासित राज्यांनी मात्र तात्काळ व्हॅट कमी करण्यास नकार दिला आहे. यात राजस्थान, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, तामिळनाडू, दिल्ली, पश्चिम बंगाल, केरळ ,ओदिशा , तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी अद्याप व्हॅट कमी केलेला नाही. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी इथल्या ग्राहकांना महाग इंधन खरेदी करावं लागत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: