वाद चिघळणार! निलोफर मलिक पाठणार देवेंद्र फडणवीसांना कायदेशीर नोटीस


हायलाइट्स:

  • देवेंद्र फडणवीसांविरोधात नवाब मलिक आक्रमक
  • अंडरवर्ल्ड प्रकरणात उद्या मोठा गौप्यस्फोट करणार
  • ड्रग्ज प्रकरणात निलोफर मलिक पाठवणार फडणवीसांना नोटीस

मुंबई: अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सर्व आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फेटाळले आहेत. फडणवीस यांच्या विरोधात उद्या आरोपांचा ‘हायड्रोजन बॉम्ब’ फोडण्याची घोषणा केली मलिक यांनी केली आहे. त्याचबरोबर, ड्रग्ज प्रकरणात जावयावर केलेल्या आरोपांवरूनही फडणवीस यांना घेरण्याची तयारी नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मलिक यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांना आठ महिन्यांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल आठ महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर त्यांची सुटका झाली आहे. समीर खान यांना समीर वानखेडे यांनी खोट्या प्रकरणात अडकवले होते व त्यामागे भाजप असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. फडणवीस व त्यांच्या पत्नीचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी मलिक यांचे जावई समीर खान यांच्या घरातून गांजा जप्त करण्यात आल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात पंचनाम्यात व आरोपपत्रात असं काहीच नाही. असं असतानाही फडणवीस यांनी आरोप केल्यानं मलिक यांची मुलगी निलोफर मलिक ही फडणवीस यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहे. स्वत: मलिक यांनी आजच्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

वाचा: सनातन संस्थेचाही अंडरवर्ल्डशी संबंध जोडायचा का?; नवाब मलिकांचा फडणवीसांना रोकडा सवाल

‘देवेंद्र फडणवीस हे कारण नसताना अवडंबर माजवत आहेत. बॉम्ब फोडण्याची भाषा त्यांनी केली होती, पण त्यांचे फटाके फुसके निघाले. ते केवळ बॉम्बस्फोट, दाऊद अशी नावं घेऊन माझी प्रतिमा मलिन करत आहेत. मागील पत्रकार परिषदेतही त्यांनी माझ्या जावयावर आरोप केले होते. माझ्या जावयाच्या घरातून गांजा जप्त केला गेला असं ते म्हणाले होते. माझी मुलगी त्यांना उद्याच नोटीस पाठवणार आहे,’ असं मलिक यांनी सांगितलं.

वाचा: ‘असे’ आहेत नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध; फडणवीसांचा दावा

आरोप केल्यानंतर मी माघार घेत नाही, माफी मागत नाही असं फडणवीस मागील पत्रकार परिषदेत म्हणाले होते. मलिक यांनी त्याचीही आठवण करून दिली. ‘या लढाईत देखील ते माफी मागणार नाहीत, आमच्याशी लढतील अशी आशा आहे, असा टोलाही मलिक यांनी हाणला.

वाचा: शाह वली खानचं घर आजही गोवावाला कम्पाउंडमध्ये आहे – नवाब मलिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: